मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने रविवारी इतिहास घडवला. इंडियन प्रीमिअर लीगचे सर्वाधिक चारवेळा जेतेपद पटकावण्याचा पराक्रम मुंबई इंडियन्सने केला. आयपीएलच्या 12व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबईने थरराक लढतीत चेन्नई सुपर किंग्सवर 1 धावेने विजय मिळवला. आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. त्याच्या नावावर कर्णधार म्हणून चार जेतेपदं जमा झाली आहेत. त्याचे हे एकूण पाचवे जेतेपद आहे. त्यामुळे या विजयाचे सेलिब्रेशनपण दणक्यात व्हायलाच हवे. सामना संपल्यानंतर हिटमॅन रोहितनं डान्स फ्लोअर गाजवला आणि त्याला सिक्सरकिंग युवराज सिंगची साथ मिळाली.
मुंबई इंडियन्से 2017 मध्ये हैदराबाद येथेच अवघ्या 1 धावेने हार मानण्यास भाग पाडले होते आणि 2019 मध्ये त्यांनी चेन्नईवरही एका धावेने विजय मिळवला. यापूर्वी मुंबईने जिंकलेल्या तीनही जेतेपदाच्यावेळी ऑरेंज कॅप पटकावणारा खेळाडू हा ऑस्ट्रेलियाचाच राहिला आहे. पण, 2013 आणि 2015 मध्ये डेव्हिड वॉर्नर आणि मुंबई इंडियन्स हे समीकरण जुळले आहे. त्यामुळे याच निकषावर मुंबईने यंदाही जेतेपदाचा चषक उंचावला. वॉर्नरने 2015 मध्ये 14 सामन्यां 7 अर्धशतकांसह 562 धावा, तर 2017 मध्ये 14 सामन्यांत 4 अर्धशतकं व 1 शतकासह 641 धावा करत ऑरेंज कॅप नावावर केली होती. यंदाही ऑरेंज कॅप ही वॉर्नरलाच मिळणार आहे. त्याने 12 सामन्यांत 8 अर्धशतकं व 1 शतकासह 692 धावा चोपल्या आहेत. त्याच्या जवळपासही कुणी नाही. त्यामुळे 2013 व 2015 प्रमाणे वॉर्नर यंदाही मुंबई इंडियन्ससाठी 'लकी बॉय' ठरला.
या विजयानंतर रोहित शर्माने 'गल्ली बॉय' चित्रपटातील रॅप साँग गायले आणि त्यावर युवीनं ठेका धरला. पाहा व्हिडीओ...