चेन्नई : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 12व्या मोसमाला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. या सामन्याच्या निमित्तान विराट कोलही आणि महेंद्रसिंग धोनी हे आजी-माजी कर्णधार समोरासमोर येणार आहे. भारतीय संघातील धोनीच्या स्थानाबद्दल सध्या उलसुलट चर्चा सुरू असल्या तरी आयपीएलमध्ये धोनीची मोहिनी कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नई सुपर किंग्सला सर्वाधिक जेतेपद जिंकून देणाऱ्या धोनीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे आणि याची प्रचिती रविवारी आली. आयपीएलच्या यंदाच्या मोसमाच्या तयारीसाठी चेन्नईचा संघ मैदानावर दाखल झाला आणि धोनीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमवर चाहत्यांची तौबा गर्दी जमली होती.
सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर निवडणूक होतील. 30 मे ते 14 जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात 17 सामने होणार आहेत.पाहा व्हिडीओ...