हैदराबाद, आयपीएल २०१९ : सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोवने ५२ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील त्याचे हे दुसरे शतक ठरले.
16व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेत जॉनी बेअरस्टोनं शतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. त्याने 52 चेंडूंत 102 धावा पूर्ण केल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात बेअरस्टोवने धडाकेबाज शतकी खेळी साकारली. शतक झळकावल्यावर बेअरस्टोवने हवेत उडी मारत आपला आनंद साजरा केला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरनेही बेअरस्टोवला यावेळी मिठी मारली.
डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबादकडून सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम नावावर केला. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 185 धावा केल्या आणि शिखर धवन व केन विलियम्सन यांनी 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केलेल्या दुसऱ्या विकेटसाठीचा 176 धावांचा विक्रम मोडला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सनरायझर्स हैदराबादला अपेक्षित सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना विक्रमाला गवसणी घातली. वॉर्नर व बेअरस्टो यांनी आयपीएलमध्ये सलग तीन सामन्यांत शतकी भागीदारी करण्याचा विक्रम केला, अशी कामगिरी करणारी ही पहिलीच जोडी ठरली.
मोईन अलीच्या पहिल्याच षटकात या जोडीनं 14 धावा काढल्या. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. हैदराबादच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना 6 षटकांत 59 धावा चोपल्या. या दोघांची ही आयपीएलमधील तिसरी अर्धशतकी भागीदारी ठरली. वॉर्नर - बेअरस्टो ही आंतरराष्ट्रीय अनुभव असलेली जोडी समोर असूनही 16 वर्षीय प्रयास रे बर्मनने चोख गोलंदाजी केली. त्यानं पहिल्याच षटकात केवळ 6 धावा दिल्या. बेअरस्टोनं अर्धशतक पूर्ण करताना संघालाही शतकी पल्ला पार करून दिला. हैदराबादने 10 षटकांत बिनबाद 105 धावा केल्या.
Web Title: IPL 2019: century of Johnny Bairstow
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.