चेन्नई, आयपीएल २०१९ : हरभजन सिंग आणि इम्रान ताहिर यांच्या भेदक गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्सने पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा ७० धावांत खुर्दा उडाला. बंगळुरुकडून पार्थिव पटेलचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही.चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या हरभजन सिंगने पहिल्याच सामन्यात आपली जादू दाखवत इतिहास रचला आहे. हरभजनने या सामन्यात चार षटकांमध्ये २० धावा देत तीन बळी मिळवले. ताहिरनेही हरभजननंतर अचूक मारा केला. ताहिरने फक्त ९ धावांमध्ये बंगळुरुच्या तीन फलंदाजांना बाद केले.
आयपीएलमध्ये आतापर्यंत स्वत:च्याच गोलंदाजीवर सर्वाधिक झेल पकडणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये हरभजनने अव्वल क्रमांक पटकावला आहे. पहिल्या सामन्यात हरभजनने मोईल अलीचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल पकडला. हरभजनने स्वत:च्याच गोलंदाजीवर हा अकरावा झेल पकडत इतिहास रचला आहे. हा पराक्रम करताना हरभजनने चेन्नईच्याच ड्वेन ब्राव्होला पिछाडीवर टाकले आहे. ब्राव्होने असा पराक्रम दहा वेळा केला होता.
स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल टिपणारे गोलंदाज11 हरभजन सिंग10 ड्वेन ब्रावो7 सुनील नरिन6 किरॉन पोलार्ड