मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या साखळी सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. आयपीएलच्या 12व्या हंगामाला 23 मार्चपासून सुरुवात होत आहे आणि गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने सुरुवातीला 17 सामन्यांचेच वेळापत्रक जाहीर केले. लोकसभा निवडणुकांच्या तारख्या जाहीर झाल्यानंतर बीसीसीआयने वेळापत्रकाचा दुसरा टप्पा जाहीर केला. यात त्यांनी 5 मे पर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले, पण प्ले-ऑफ आणि अंतिम फेरीच्या सामन्यांच्या तारख्या गुलदस्त्यात आहेत. सर्व संघ घरच्या मैदानावर सात सामने खेळणार आहेत.
गतवर्षी चेन्नईला घरच्या मैदानावर एकच सामना खेळता आला होता आणि उर्वरित सात सामने त्यांनी पुण्यात खेळले होते. पण, यंदा चेन्नईचे सर्व सामने घरच्या प्रेक्षकांसमोरही होणार आहेत.
चेन्नईचे सामने कधी व कोठे?23 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू, चेन्नई26 मार्च : दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली31 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, चेन्नई3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई 6 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई9 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, चेन्नई11 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, जयपूर14 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता17 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद21 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू23 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. सनराइझर्स हैदराबाद, चेन्नई26 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई1 मे : चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई5 मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स , मोहाली
चेन्नई सुपर किंग्सचा संघमहेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, फॅफ ड्यू प्लेसिस, मुरली विजय, रवींद्र जाडेजा, सॅम बिलिंग, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एनगिडी, इम्रान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायुडू, हरभजन सिंग, दीपक चहर, के एम आसीफ, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, कर्ण शर्मा, ध्रुव शोराय, एन जगदीशन, शार्दूल ठाकूर, मोनू कुमार, चैतन्य बिशोनी