IPL 2019: राजस्थानवर विजयासह चेन्नई अव्वल

चेन्नईने सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 11:55 PM2019-03-31T23:55:58+5:302019-04-01T00:10:32+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Chennai Super Kings win over Rajasthan Royals | IPL 2019: राजस्थानवर विजयासह चेन्नई अव्वल

IPL 2019: राजस्थानवर विजयासह चेन्नई अव्वल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल २०१९ : महेंद्रसिंग धोनीची धडाकेबाज खेळी आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थानव रॉयल्सवर आठ धावांनी विजय मिळवला. धोनीच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईचा 175 धावा उभारता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 167 धावा करता आल्या. चेन्नईने सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

चेन्नईच्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला. त्यानंतर राजस्थानने १४ धावांत अजून दोन फलंदाज गमावले. पण त्यानंतर राहुल त्रिपाठी (39) आणि स्टीव्हन स्मिथ (28) यांनी राजस्थानचा डाव सावरला. पण हे दोघे बाद झाल्यावर बेन स्टोक्सने संघाचे आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या षटकामध्ये स्टोक्सच्या रुपात राजस्थानला मोठा धक्का बसला. स्टोक्सने २६ चेंडूंत ४६ धावा केल्या.

चांगली सुरुवात झाली नसली तरी महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचा डाव फक्त सावरला नाही, तर सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. धोनीच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईचा 175 धावा उभारता आल्या. धोनीने ४६ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 75 धावा केल्या.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकाराले आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला. त्यामुळे चेन्नईचे तीन फलंदाज फक्त २७ धावांत बाद झाले. पण त्यानंतर मात्र धोनी आणि सुरेश रैना यांनी संघाला सावरले. रैनाने ३२ चेंडूंत ३६ धावा केल्या.


पाहा धोनी इफेक्ट, जेव्हा बेल्सलाही वाटते 'माही'ने खेळावे
राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईची सुरुवात चांगली झाली नव्हती. चेन्नईने आपले पहिले तिन्ही फलंदाज २७ धावांमध्ये गमावले होते. त्यानंतर धोनी खेळायला आला. धोनीला बाद करण्याचे राजस्थानने बरेच प्रयत्न केले. पण स्टम्पच्या बेल्सला ते मान्य नसल्याचे पाहायला मिळाले. 

हा प्रकार घडला तो पाचव्या षटकात. पाचवे षटक जेफ्रो आर्चर टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूचा सामना धोनी करत होता. धोनीचा हा सामन्यातील दुसराच चेंडू होता आणि त्याने अजून आपले खातेही उघडले नव्हते. त्यावेळी हा पाचव्या षटकातील चौथा चेंडू यष्ट्यांना लागला होता. पण धोनी आऊट मा६ झाला नाही. कारण त्यावेळी स्टम्पवरील बेल्स पडली नाही आणि धोनी नाबाद राहिला.

हा पाहा खास व्हिडीओ



 

Web Title: IPL 2019: Chennai Super Kings win over Rajasthan Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.