चेन्नई, आयपीएल 2019 : भेदक गोलंदाजी आणि आश्वासक फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने कोतकातावर सहज विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नईने सात विकेट्स राखत हा सामना सहज जिंकला.
कोलकाताचे १०९ धावांचे आव्हान फारच कमी होते. चेन्नईच्या फलंदाजांनीही आरामात फलंदाजी करत सहजपणे विजयावर शिक्कामोर्तब केले. फॅफ ड्यू प्लेसिस आणि अंबाती रायुडू या जोडीने चेन्नईचा विजय सुकर केला. धावांचा पाठलाग करताना रायुडू २१ धावांवर बाद झाला. पण फॅफने अखेरपर्यंत किल्ला लढवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. फॅफने नाबाद ४३ धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्सच्या भेदक गोलंदाजीपुढे कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांना लोटांगण घालावे लागले. यामध्ये अपवाद ठरला तो आंद्रे रसेल. कारण सरेलने ४४ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ५० धावांची खेळी साकारल्यामुळेच कोलकात्याला प्रथम फलंदाजी करताना 108 धावा करता आल्या. दीपक चहारने भेदक मारा करत तीन बळी मिळवले, तर इम्रान ताहिर आणि हरभजन सिंग यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले.
चेन्नईने नाणेफेक जिंकून कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सुनील नरिनच्या रुपात कोलकात्याला मोठा धक्का बसला. नरिनला यावेळी सहा धावा करता आल्या. त्यानंतर नितीश राणा शून्यावर बाद झाला. त्यानंतर ठराविक फरकाने कोलकात्याचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांचा अर्धा संघ ४४ धावांवर माघारी परतला.
Web Title: IPL 2019: Chennai Super Super easy victory over Kolkata
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.