आयपीएल २०१९ : धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने दिल्लीवर ८० धावांनी दमदार विजय मिळवला.
दिल्लीने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. चेन्नईच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सलामीवीर शेन वॉटसनला एकही धाव करता आली नाही. पण त्यानंतर सुरेश रैना आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी संघाला सावरले. सुरेश रैना आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी संयत फलंदाजी करत नवव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी रचली. फॅफच्या रुपात चेन्नईला दुसरा धक्का बसला. फॅफने ४१ चेंडूंत ३९ धावा केल्या. त्यानंतर सुरेश रैनाच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का बसला. रैनाने ३७ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५९ धावा केल्या.
पीचवर पडूनही रैनाने मारला चौकार दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आजच्या सामन्यात एक वेगळाच किस्सा पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी सुरेश रैनाने चक्क पीचवर पडून चौकार मारल्याचे पाहायला मिळाले.
अक्षर पटेलच्या सहाव्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रैना एक फटका मारायला गेला. पण त्यावेळी त्याचा तोल योग्य न राहिल्यामुळे तो पीचवर पडला. पण त्याने जो फटका मारला तो थेट सीमारेषेवर गेला आणि रैनाला चौकार मिळाला.
जेव्हा धोनी मारतो एका हाताने सिक्सर, व्हिडीओ वायरलकाही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी दुखापतग्रस्त असल्याचे म्हटले गेले होते. पण आजच्या सामन्यात मात्र धोनीने धडाकेबाज फलंदाजी केली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तर धोनीने चक्क एका हातेन षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.
या सामन्याच्या १९व्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. १९वे षटक दिल्लीचा ख्रिस मॉरिस टाकत होता. यावेळी मॉरिसच्या हातातून चेंडू सुटला आणि थेट धोनीच्या पोटाजवळ आला. हा चेंडू नो बॉल असल्याचे पंचांनी सांगितले. त्यानंतर धोनीने या चेंडूवर एका हाताने षटकार मारल्याचे पाहायला मिळाले.
हा पाहा व्हिडीओ
पीचवर पडूनही रैनाने मारला चौकार दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आजच्या सामन्यात एक वेगळाच किस्सा पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी सुरेश रैनाने चक्क पीचवर पडून चौकार मारल्याचे पाहायला मिळाले.
अक्षर पटेलच्या सहाव्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रैना एक फटका मारायला गेला. पण त्यावेळी त्याचा तोल योग्य न राहिल्यामुळे तो पीचवर पडला. पण त्याने जो फटका मारला तो थेट सीमारेषेवर गेला आणि रैनाला चौकार मिळाला.
डि'व्हिलियर्सने एका हाताने चेंडू स्टेडियमबाहेर फटकावलारॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा डाव यावेळी सावरला तो एबी डि'व्हिलियर्सने. डि'व्हिलियर्सने 44 चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद 82 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या खेळीमध्ये डि'व्हिलियर्सने चक्क एका हाताने षटकार मारला आणि हा चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.
ही गोष्ट घडली सामन्याच्या 19व्या षटकात. मोहम्मद शमी हे षटक टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डि'व्हिलियर्सने एक फटका मारला. त्यानंतर तो चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.
सुरेश रैनाच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
दिल्लीने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. चेन्नईच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सलामीवीर शेन वॉटसनला एकही धाव करता आली नाही. पण त्यानंतर सुरेश रैना आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी संघाला सावरले. सुरेश रैना आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी संयत फलंदाजी करत नवव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी रचली. फॅफच्या रुपात चेन्नईला दुसरा धक्का बसला. फॅफने ४१ चेंडूंत ३९ धावा केल्या. त्यानंतर सुरेश रैनाच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का बसला. रैनाने ३७ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५९ धावा केल्या.
पीचवर पडूनही रैनाने मारला चौकार दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आजच्या सामन्यात एक वेगळाच किस्सा पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी सुरेश रैनाने चक्क पीचवर पडून चौकार मारल्याचे पाहायला मिळाले.
अक्षर पटेलच्या सहाव्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रैना एक फटका मारायला गेला. पण त्यावेळी त्याचा तोल योग्य न राहिल्यामुळे तो पीचवर पडला. पण त्याने जो फटका मारला तो थेट सीमारेषेवर गेला आणि रैनाला चौकार मिळाला.
पाहा हा व्हिडीओ