चेन्नई, आयपीएल २०१९ : वानखेडे स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाबच्याख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांचा फटकेबाजीचा भांगडा पाहायला मिळाला. गेल आणि राहुल यांच्यापुढे मुंबईच्या गोलंदाजांनी लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. जोरदार फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 197 धावा फटकावल्या.
मुंबईने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या गोष्टीचा चांगलाच फायदा गेल आणि राहुल यांनी उचलला. गेलचे वादळ पुन्हा एकदा घोंगावल्याचे पाहायला मिळाले.
मुंबईचे गोलंदाज काही काळ गेलच्या फटकेबाजीपुढे नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. गेलने ३६ चेंडूंमध्ये ६३ धावांची वादळी खेळी साकारली, यामध्ये तीन चौकार आणि सात चौकारांचा समावेश होता.
गेल बाद झाल्यावर राहुलने जोरदार फटकेबाजी करत संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला.