मोहाली, आयपीएल 2019 : किंग्ज इलेव्हन पंजाबचाख्रिस गेलची धडाकेबाज फलंदाजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाली. गेलच्या फटकेबाजीमुळेच पंजाबला बंगळुरुपुढे 174धावांचे आव्हान ठेवता आले. गेलने नाबाद 99 धावांची दमदार खेळी साकारली.
बंगळुरुने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. गेल आणि लोकेश राहुल यांनी या गोष्टीचा चांगला फायदा उचलला. या दोघांनी सहा षटकांमध्ये संघाला 60 धावांची सलामी दिली. त्यानंतर सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लोकेश राहुलने षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या नादात युजवेंद्र चहलच्या चेंडूवर तो यष्टीचीत झाला. राहुल बाद झाल्या गेलने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. एका टोकाकडून फलंदाज बाद होत असले तरी गेलने मात्र धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी चोख बजावली.
जेव्हा गेल आणि चहल यांची धक्काबुक्की होते तेव्हाकिंग्ज इलेव्हन पंजाबचाख्रिस गेल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा युजवेंद्र चहल यांना डोळ्यासमोर आणून बघा. या दोघांमध्ये जर धक्काबुक्की झाली तर काय होईल, हे आता तुमच्या डोळ्यापुढे आलेच असेल. पण असे घडल्याचे मोहालीच्या स्टेडियममध्ये पाहायला मिळाले आहे.
पंजाबच्या सलामीवीरांनी पहिल्या सहा षटकांमध्ये बळी न मिळवता 60 धावांची सलामी दिली. त्यानंतर सातव्या षटकामध्ये विराट कोहलीने चहलच्या हाती चेंडूं सुपूर्द केली. चहल सातवे षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. यावेळी चहल गोलंदाजीचा सराव करत होता. त्यावेळी लोकेश राहुल हा स्ट्राइकवर होता, तर गेल हा नाइट स्ट्राइकवर होता. त्यावेळी चहलने खेळपट्टीकडे पाहिले आणि हाताला माती लावली. त्यावेळी गेल आणि चहलमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. पण ती धक्काबुक्की नव्हती. तर गेलने गमतीने चहलला ढकलल्याचे त्यानंतर निष्पन्न झाले.