IPL 2019 : धोनीच्या संघाला मोठा धक्का, जलदगती गोलंदाज एनगिडीची माघार

IPL 2019: चेन्नईचा संघ यंदाही जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 08:28 PM2019-03-20T20:28:57+5:302019-03-20T20:29:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: CSK Speedster Lungi Ngidi set to miss #IPL2019 with side strain | IPL 2019 : धोनीच्या संघाला मोठा धक्का, जलदगती गोलंदाज एनगिडीची माघार

IPL 2019 : धोनीच्या संघाला मोठा धक्का, जलदगती गोलंदाज एनगिडीची माघार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12व्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना खेळवण्यात येणार आहे. 2018 साली आयपीएलमध्ये कमबॅक करताना ऐटीत जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईचा संघ यंदाही जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. पण, पहिल्या सामन्यापूर्वीच त्यांना मोठा धक्का बसला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघातील प्रमुख गोलंदाज लुंगी एनगिडीनं दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा 22 वर्षीय जलदगती गोलंदाज एनगिडीच्या दुखापतीनं डोकं वर काढलं आहे आणि त्यामुळे त्याला आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वन डे सामन्यात त्याला ही दुखापत झाली होती आणि त्यातून इतक्यात सावरणे शक्य नसल्यानं तो आयपीएलच्या सामन्यांना मुकणार आहे. 

एनगिडीच्या दुखापतीबद्दल दक्षिण आफ्रिका संघाचे व्यवस्थापक मोहम्मद मूसाजी यांनी सांगितले की,'' श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वन डे सामन्यात गोलंदाजी करणे एनगिडीला जमले नव्हते. त्यामुळे त्याला गोलंदाजी करण्यापासून त्वरित रोखण्यात आले. त्याच्या स्नायूत दुखापत झाली आहे आणि त्याला चार आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यानंतर तो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पुर्नविकास केंद्रात सहभागी होणार आहे.'' 

चेन्नईचे सामने कधी व कोठे?

23 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू, चेन्नई
26 मार्च : दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
31 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, चेन्नई
3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई 
6 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई
9 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, चेन्नई
11 एप्रिल :  राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, जयपूर
14 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता
17 एप्रिल :  सनराइझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद
21 एप्रिल :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू
23 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. सनराइझर्स हैदराबाद, चेन्नई
26 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
1 मे : चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई
5 मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स    , मोहाली
 
चेन्नई सुपर किंग्सचा संघ
महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, फॅफ ड्यू प्लेसिस, मुरली विजय, रवींद्र जाडेजा, सॅम बिलिंग, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एनगिडी, इम्रान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायुडू, हरभजन सिंग, दीपक चहर, के एम आसीफ, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, कर्ण शर्मा, ध्रुव शोराय, एन जगदीशन, शार्दूल ठाकूर, मोनू कुमार, चैतन्य बिशोनी

Web Title: IPL 2019: CSK Speedster Lungi Ngidi set to miss #IPL2019 with side strain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.