10 May, 19 11:08 PM
10 May, 19 10:56 PM
10 May, 19 10:50 PM
सुरेश रैनाही ( 11) लगेच बाद झाला. त्यानंतर कर्णधार धोनी आणि अंबाती रायुडू यांनी चेन्नईचा संघर्ष सुरूच ठेवला.
10 May, 19 10:36 PM
32व्या चेंडूवर तोही बाद झाला. मिश्राच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात त्याने बोल्टच्या हाती झेल दिला. 50 धावांच्या खेळीत त्याने 3 चौकार व 4 षटकार खेचले.
10 May, 19 10:31 PM
फॅफनंतर वॉटसनने सामन्याची जबाबदारी खांद्यावर घेत दिल्लीच्या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याने 12व्या षटकात किमो पॉलच्या गोलंदाजीवर तीन खणखणीत षटकार आणि एक चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 31 चेंडूंत 50 धावा केल्या.
10 May, 19 10:23 PM
फॅफ-वॉटसनची 81 धावांची भागीदारी संपुष्टात
10 May, 19 10:22 PM
मात्र, 39व्या चेंडूवर फॅफने विकेट फेकली. ट्रेंट बोल्टला मोठा फटका मारण्याच्या नादात तो किमो पॉलकरवी झेलबाद झाला. फॅफने 7 चौकार व 1 षटकारांसह 50 धावांची खेळी केली.
10 May, 19 10:18 PM
फॅफने 37 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. फॅफचे हे यंदाच्या सत्रातील तिसरे आणि एकूण आयपीएलमधील 12वे अर्धशतक ठरले.
10 May, 19 10:14 PM
नशीबानेही चेन्नईच्या फलंदाजांची भरपूर साथ दिली. 9व्या षटकात वॉटसनचा झेल टिपण्यात दिल्लीच्या खेळाडूला अपयश आले. अमित मिश्राच्या गोलंदाजीवर वॉटसनने मारलेला चेंडू बराच काळ हवेत होता, परंतु तो टिपण्यासाठी दिल्लीचा क्षेत्ररक्षक जवळ येईपर्यंत चेंडू जमिनीवर आला होता.
10 May, 19 10:00 PM
खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर फॅफने आक्रमक खेळ सुरू केला. त्याने सहाव्या षटकात इशांत शर्माला सलग तीन चौकार ठोकले. चेन्नईने पॉवर प्लेमध्ये बिनबाद 42 धावा केल्या.
10 May, 19 09:59 PM
दिल्लीच्या गोलंदाजांची टिच्चून मारा करताना चेन्नईच्या फलंदाजांना दबावात ठेवले. फॅफ आणि वॉटसन यांनीही कोणताही धोका न पत्करता सावध खेळावर भर दिला.
10 May, 19 09:44 PM
या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला पहिल्याच षटकात धक्का बसला असता, परंतु दिल्लीच्या गचाळ क्षेत्ररक्षणाने संधी गमावली. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फॅफ ड्यू प्लेसिसने चेंडू टोलावला. तो चेंडू दिल्लीच्या खेळाडूच्या हातात असतानाही नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या शेन वॉटसनने धाव घेण्यासाठी क्रिज सोडले. फॅफ आणि वॉटसन यांच्यातील समन्वयाच्या फायदा दिल्लीला सहज झाला असता. त्यांना दोघांनाही धावबाद करण्याची संधी होती, परंतु धावबाद सोडा दिल्लीच्या खेळाडूंनी चेन्नईला अतिरिक्त धावा दिल्या.
10 May, 19 09:11 PM
पंत एका बाजूनं खिंड लढवत होता, परंतु 19व्या षटकात चहरने त्याला बाद केले. पंतने 25 चेंडूंत 38 धावा केल्या. त्यात 2 चौकार व 1 षटकार खेचला.
10 May, 19 09:10 PM
10 May, 19 08:58 PM
चहरकडून दिल्लीला मिळाल्या सहा धावा
10 May, 19 08:56 PM
पंतला जीवदान
17व्या षटकात रिषभ पंतने टोलावलेला चेंडू दीपक चहरने झेलला, परंतु तो सीमारेषेबाहेर गेल्याने दिल्लीला षटकार मिळाला. धोनीनं मात्र चहरच्या या कामगिरीवर नाराजी प्रकट केली.
10 May, 19 08:45 PM
धोनीच्या चाणाक्ष नेतृत्वासमोर दिल्लीच्या फलंदाजांना मुक्तपणे फटकेबाजी करता आली नाही. दिल्लीनं 15 षटकांत पाच विकेट गमावून 93 धावा केल्या होत्या.
10 May, 19 08:39 PM
10 May, 19 08:37 PM
धोनीनं DRS गमावला
10 May, 19 08:34 PM
10 May, 19 08:33 PM
अक्षर पटेलही (3) लगेच बाद झाला. ड्वेन ब्राव्होने त्याला बाद केले.
10 May, 19 08:27 PM
धोनीनं आपला हुकुमी एक्का काढला. इम्रान ताहीरने 12व्या षटकात दिल्लीचा कर्णधार अय्यरला बाद केले. अय्यर 13 धावांवर माघारी परतला.
10 May, 19 08:23 PM
10 May, 19 08:12 PM
10 May, 19 08:12 PM
मुन्रो आणि कर्णधार श्रेयस अय्यर ही जोडी चांगला खेळ करेल असे वाटले होते, परंतु रवींद्र जडेजाने ती तोडली. त्याने मुन्रोला ( 27) बाद केले.
10 May, 19 08:08 PM
धवनला केलं धोनीनं बाद
10 May, 19 08:07 PM
DRS म्हणजे धोनी रिव्ह्यू सिस्टम
10 May, 19 08:01 PM
कॉलिन मुन्रोने दिल्लीचा डाव सावरला. त्याने धवनसह चांगली फलंदाजी केली, परंतु पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात फिरकीपटू हरभजन सिंगने धवनला बाद केले. 14 चेंडूंत 18 धावा करून धवन माघारी फिरला. यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीनं त्याचा झेल टिपला.
10 May, 19 07:59 PM
10 May, 19 07:47 PM
पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या खेळात आत्मविश्वास दिसला. शार्दूल ठाकूरला सलग तीन चौकार.... शिखर धवनने फटकेबाजी केली. पण, दीपक चहरने दिल्लीला धक्का दिला. त्याने तिसऱ्याच षटकात पृथ्वीला पायचीत केले.
10 May, 19 07:46 PM
10 May, 19 07:46 PM
दीपक चहरने पृथ्वी शॉला पायचीत केले
10 May, 19 07:41 PM
पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या खेळात आत्मविश्वास दिसला. शार्दूल ठाकूरला सलग तीन चौकार.... शिखर धवनने फटकेबाजी केली.
10 May, 19 07:24 PM
10 May, 19 07:12 PM
10 May, 19 07:12 PM
10 May, 19 07:12 PM
10 May, 19 07:06 PM
नाणेफेक गमावूनही दिल्लीचा कर्णधार हॅप्पी
10 May, 19 06:36 PM
चेन्नईली चिअर करायला कोण कोण आले, पाहा फोटो
10 May, 19 06:18 PM
10 May, 19 06:18 PM