10 Apr, 19 12:16 AM
चेन्नई अव्वल स्थानावर
भेदक गोलंदाजी आणि आश्वासक फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने कोतकातावर सहज विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नईने सात विकेट्स राखत हा सामना सहज जिंकला
09 Apr, 19 11:22 PM
चेन्नईला तिसरा धक्का
रायुडूच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का बसला. रायुडने २१ धावा केल्या.
09 Apr, 19 10:23 PM
चेन्नईला दुसरा धक्का
सुरेश रैनाच्या रुपात चेन्नईला दुसरा धक्का बसला. रैनाने १४ धावा केल्या.
09 Apr, 19 10:11 PM
चेन्नईला पहिला धक्का
वॉटसनच्या रुपात चेन्नईला पहिला धक्का बसला. चेन्नईला १७ धावा करता आल्या.
09 Apr, 19 09:22 PM
प्रसिद कृष्णा आऊट
प्रसिद कृष्णाच्या रुपात कोलकात्याला नववा धक्का बसला, त्याला एकही धाव काढता आली नाही.
09 Apr, 19 09:19 PM
कोलकात्याला आठवा धक्का
हरभजनने सोळाव्या षटकातच चावला नंतर कुलदीप यादवला आऊट केले. कुलदीपला भोपळाही फोडता आला नाही.
09 Apr, 19 09:17 PM
पीयुष चावला आऊट
हरभजन सिंगने पीयुष चावलाला आऊट करत कोलकात्याला सातवा धक्का दिला.
09 Apr, 19 09:11 PM
रसेलला आठ धावांवर जीवदान
इम्रान ताहिरच्या तेराव्या षटकात रसेलला जीवदान मिळाले. रसेल आठ धावांवर असता हरभजनने झेल सोडला.
09 Apr, 19 08:57 PM
रसेलला आठ धावांवर जीवदान
इम्रान ताहिरच्या तेराव्या षटकात रसेलला जीवदान मिळाले. रसेल आठ धावांवर असता हरभजनने झेल सोडला.
09 Apr, 19 08:48 PM
शुभमन गिल आऊट
शुभमन गिलच्या रुपात कोलकात्याला सहावा धक्का बसला. गिलने १२ चेंडूंत ९ धावा केल्या.
09 Apr, 19 08:42 PM
कोलकात्याचा अर्धा संघ बाद
दिनेश कार्तिकच्या रुपात कोलकात्याला पाचवा धक्का बसला. कार्तिकला २१ चेंडूंत १९ धावा करता आल्या.
09 Apr, 19 08:24 PM
कोलकात्याला चौथा धक्का
रॉबिन उथप्पाच्या रुपात कोलकात्याला चौथा धक्का बसला. उथप्पाने ११ धावा केल्या.
09 Apr, 19 08:20 PM
कोलकात्याची बिकट अवस्था, ३ बाद ९
09 Apr, 19 08:13 PM
कोलकात्याला तिसरा धक्का
नितीश राणाच्या रुपात कोलकात्याला तिसरा धक्का बसला. राणा शून्यावर बाद झाला.
09 Apr, 19 08:09 PM
कोलकात्याला मोठा धक्का
सुनील नरिनच्या रुपात कोलकात्याला मोठा धक्का बसला. नरिनला यावेळी सहा धावा करता आल्या.
09 Apr, 19 08:05 PM
कोलकात्याला पहिला धक्का
ख्रिस लिनच्या रुपात कोलकात्याला पहिला धक्का बसला. लिनला भोपळाही फोडता आला नाही.
09 Apr, 19 07:49 PM
रसेलचा धसका धोनीने घेतलाय...
09 Apr, 19 07:47 PM
धोनी लेग स्पिनचा सराव का करतोय...
09 Apr, 19 07:36 PM
कोलकाताची प्रथम फलंदाजी
कोलकाताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल चेन्नईच्या बाजूने लागला. नाणेफेक जिंकत चेन्नईने कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.
09 Apr, 19 07:30 PM
रसेलने केला दमदार सराव
चेन्नई-कोलकाता सामन्यांमध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते आंद्रे रसेलवर. रसेलने या सामन्यापूर्वी चांगलाच सराव केल्याचे पाहायला मिळाले.