चेन्नई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्यानंतर गतविजेता चेन्नई सुपर किंग्सचा संघ आयपीएलमध्ये पुन्हा विजयपथावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. चेन्नईला घरच्या मैदानावर शनिवारी किंग्स इलेव्हन पंजाबचा सामना करावा लागणार आहे. चेन्नईने सलग तीन सामने जिंकून आयपीएलच्या 12व्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली, परंतु मुंबई इंडियन्सने त्यांचा विजयरथ रोखला. हार्दिक पांड्याने 8 चेंडूंत 25 धावांची खेळी केली आणि 3 विकेट्सही घेतल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्सला चेन्नईवर विजय मिळवता आला.
रायुडूचा फॉर्म चिंतेचा विषय चेन्नई सुपरकिंग्स संघासाठी अंबाती रायुडूचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरत आहे. रायुडूला चार सामन्यांत 28, 5, 1 आणि 0 अशाच धावा करता आल्या आहेत. रायुडूच्या अपयशामुळे पॉवर प्लेमध्ये चेन्नईला मोठी धावसंख्या उभारण्यातही अपयश आले आहे.
तीन विजयांनी पंजाबचा आत्मविश्वास वाढलापंजाबने चार सामन्यांत तीन विजय मिळवले आहेत आणि गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सॅम कुरणने हॅटट्रिक घेत पंजाबला विजय मिळवून दिला होता. या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्याच आत्मविश्वसाने ते चेन्नईचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आयपीएलमध्ये चेन्नई आणि पंजाब यांच्यात आतापर्यंत 19 सामने झाले आहेत आणि त्यात 11 सामने चेन्नईने जिंकले आहेत.
सामन्याची वेळ व ठिकाण सायंकाळी 4 वाजल्यापासून एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
- सामन्यात चेन्नईचा स्टार खेळाडू ड्वेन ब्राव्होला दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे. त्याला दोन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या जागी न्यूझीलंडच्या स्टॉट कगेलिनचा समावेश होऊ शकतो.
- पंजाबच्या संघात हर्डस व्हिलजोएनच्या जागी ख्रिस गेलचा समावेश होणार आहे. त्यामुळे पंजाबची बॅटिंग लाईनअप अधिक मजबूत झाली आहे.