26 Apr, 19 11:33 PM
मलिंगाच्या गोलंदाजीवर सँटनर बाद; मुंबईचा 46 धावांनी विजय
26 Apr, 19 11:30 PM
हरभजन सिंग बाद; चेन्नईचे नऊ फलंदाज माघारी
26 Apr, 19 11:27 PM
17 षटकानंतर चेन्नई 8 बाद 103
26 Apr, 19 11:24 PM
बुमराहच्या गोलंदाजीवर दीपक चहर बाद; चेन्नईला आठवा धक्का
26 Apr, 19 11:21 PM
मलिंगाच्या गोलंदाजीवर ड्वेन ब्राव्हो बाद; चेन्नईला मोठा धक्का
26 Apr, 19 11:12 PM
15 षटकांनंतर चेन्नई 6 बाद 88; विजयासाठी 68 धावांची गरज
26 Apr, 19 10:59 PM
जसप्रीत बुमराहने 12व्या षटकात मुरली विजयला बाद केले. विजयने 35 चेंडूंत 38 धावा केल्या.
26 Apr, 19 10:48 PM
26 Apr, 19 10:47 PM
विजय एका बाजूने संयमी खेळ करत विकेट टिकवून होता. पण, मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या अनुकूल रॉयने चेन्नईला धक्का दिला. त्याने ध्रुव शौरेयला बाद केले. चेन्नईचे पाच फलंदाज 10 षटकांत 60 धावांवर माघारी परतले होते.
26 Apr, 19 10:44 PM
26 Apr, 19 10:36 PM
कृणाल विकेट घेतो तेव्हा...
26 Apr, 19 10:34 PM
कृणालने मुंबईला आणखी एक यश मिळवून दिले. त्याने केदार जाधवला त्रिफळाचीत केले. केदारला 6 धावा करता आल्या.
26 Apr, 19 10:31 PM
सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विजयचा झेल हवेत उडाला होता आणि तो टिपण्यासाठी कृणाल पांड्याने प्रयत्नही केले, परंतु त्याला यश मिळाले नाही.
26 Apr, 19 10:29 PM
मुरली विजयचा झेल टिपण्याचा कृणाल पांड्याचा अयशस्वी प्रयत्न
26 Apr, 19 10:19 PM
त्यापाठोपाठ अंबाती रायुडूही त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. कृणाल पांड्याच्या सुरेख चेंडूंनं रायुडूच्या यष्टिंचा वेध घेतला.
26 Apr, 19 10:16 PM
26 Apr, 19 10:14 PM
26 Apr, 19 10:13 PM
मलिंगाच्या दुसऱ्या षटकात मुरली विजयला जीवदान मिळाला. अनुकूल रॉयने झेल सोडला. पण, हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात सुरेश रैनाला बाद करून ती कसर भरून काढली. रैना 2 धावांवर बाद झाला.
26 Apr, 19 10:09 PM
26 Apr, 19 10:08 PM
लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. मागील सामन्यातील शतकवीर शेन वॉटसन षटकाच्या पाचव्या चेंडूवर लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर राहुल चहरच्या हातात झेल देऊन माघारी परतला.
26 Apr, 19 09:47 PM
26 Apr, 19 09:22 PM
26 Apr, 19 09:20 PM
इम्रान ताहीरने मुंबईच्या कृणाल पांड्याला (1) बाद केले. मुंबईच्या 14 षटकांत 3 बाद 103 धावा झाल्या होत्या. सँटनरने रोहितला बाद केले. रोहितने 48 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून 67 धावा केल्या.
26 Apr, 19 09:11 PM
26 Apr, 19 09:08 PM
26 Apr, 19 09:08 PM
इम्रान ताहीरने मुंबईच्या कृणाल पांड्याला (1) बाद केले.
26 Apr, 19 09:05 PM
चेन्नईविरुद्ध त्याचे हे सातवे अर्धशतक आहे आणि चेन्नईविरुद्ध फलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे.
26 Apr, 19 09:04 PM
रोहितने त्याच षटकात यंदाच्या मोसमातील पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 37 चेंडूंत हे अर्धशतक पूर्ण केले.
26 Apr, 19 09:01 PM
रोहित-लुईस जोडीनं चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी आळीपाळीनं चेन्नईच्या गोलंदाजांवर प्रहार केला. पण, 13व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ही जोडी तुटली. मिचेल सँटनरने लुईसला बाद केले. लुईसने 30 चेंडूंत 32 धावा केल्या. रोहित-लुईसने 75 धावांची भागीदारी केली आणि यंदाच्या हंगामातील मुंबई इंडियन्सकडून ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली.
26 Apr, 19 08:58 PM
धोनीकडून ही चूक झालीच नसती
IPL 2019 CSK vsMI : मुंबईचाइव्हानलुईसआऊटहोता, पणधोनीनसल्यानंतोवाचला...https://t.co/p49fiesOrc@msdhoni@mipaltan@ChennaiIPL#CSKvsMI@harbhajan_singh@IPL
26 Apr, 19 08:42 PM
26 Apr, 19 08:41 PM
एव्हीन लुईस आणि रोहित शर्मा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
26 Apr, 19 08:38 PM
26 Apr, 19 08:33 PM
26 Apr, 19 08:24 PM
26 Apr, 19 08:23 PM
महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत सुरैश रैनाच्या नेतृत्वाखाली चेन्नईने चांगली सुरुवात केली. नाणेफेक जिंकून रैनाने मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात केली. पण, दीपक चहरने तिसऱ्या षटकात मुंबईला पहिला धक्का दिला. चहरने मुंबईचा सलामीवीर डी कॉकला ( 15) माघारी पाठवले.
26 Apr, 19 08:02 PM
26 Apr, 19 07:39 PM
मुंबईच्या संघात एव्हिन लुईस आणि अनुकुल रॉय यांना बेन कटींग व मयांक मार्कंडेच्या जागी संधी. अनुकुल रॉय आज पदार्पण करत आहे.
26 Apr, 19 07:38 PM
चेन्नईच्या संघात तीन बदल... मिचेल सँटनर, ध्रुव शोरेय आणि मुरली विजय यांना संधी
26 Apr, 19 07:36 PM
26 Apr, 19 07:29 PM
अनुकुल रॉय मुंबई इंडियन्सच्या संघातून पदार्पण करणार