चेन्नई, आयपीएल 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्सला शुक्रवारी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सच्या 155 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला 109 धावाच करता आल्या. या विजयासह मुंबईने दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
रोहित शर्मा आणि इव्हान लुईसच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने 4 बाद 155 धावा केल्या. चेन्नईसमोर विजयासाठी 156 धावांचे लक्ष्य आहे. रोहितने 48 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून 67 धावा केल्या. लुईसने 30 चेंडूंत 32 धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजांची सुरेख कामगिरी करताना मुंबईच्या धावांवर वेसण घातली. IPL 2019 CSK vsMI : रोहित-लुईसचीखेळी; मुंबईइंडियन्सच्यासमाधानकारकधावाhttps://t.co/c2cPZpukGV@mipaltan@ChennaiIPL@IPL#CSKvMI विजय एका बाजूने संयमी खेळ करत विकेट टिकवून होता. पण, मुंबईकडून पदार्पण करणाऱ्या अनुकूल रॉयने चेन्नईला धक्का दिला. त्याने ध्रुव शौरेयला बाद केले. चेन्नईचे पाच फलंदाज 10 षटकांत 60 धावांवर माघारी परतले होते. त्यानंतरही चेन्नईचे धक्का सत्र कायम राहिले. खेळपट्टीवर चिकटलेला विजय माघारी परतला. या धक्क्यातून चेन्नई सावरू शकला नाही.