IPL 2019 CSK vs MI : रोहित-लुईसची खेळी; मुंबई इंडियन्सच्या समाधानकारक धावा

IPL 2019 CSK vs MI: रोहित शर्मा आणि इव्हान लुईसच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 4 बाद 155 धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 09:41 PM2019-04-26T21:41:51+5:302019-04-26T21:42:31+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 CSK vs MI: Mumbai Indians set 156 runs target to Chennai Super Kings | IPL 2019 CSK vs MI : रोहित-लुईसची खेळी; मुंबई इंडियन्सच्या समाधानकारक धावा

IPL 2019 CSK vs MI : रोहित-लुईसची खेळी; मुंबई इंडियन्सच्या समाधानकारक धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चेन्नई, आयपीएल 2019 :  रोहित शर्मा आणि इव्हान लुईसच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 4 बाद 155 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी 156 धावांचे लक्ष्य आहे. रोहितने 48 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून 67 धावा केल्या. लुईसने 30 चेंडूंत 32 धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजांची सुरेख कामगिरी करताना मुंबईच्या धावांवर वेसण घातले. 



 

महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत सुरैश रैनाच्या नेतृत्वाखाली चेन्नईने चांगली सुरुवात केली. नाणेफेक जिंकून रैनाने मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात केली. पण, दीपक चहरने तिसऱ्या षटकात मुंबईला पहिला धक्का दिला. चहरने मुंबईचा सलामीवीर डी कॉकला ( 15)  माघारी पाठवले. इव्हान लुईसने कॅप्टन रोहितसह मुंबईला पॉवर प्लेमध्ये 1 बाद 45 धावा उभारून दिल्या. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. लुईसने इम्रान ताहीरच्या एका षटकात 14 धावा चोपून काढल्या. डावाच्या 7 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लुईसच्या बॅटची कडा घेत चेंडू यष्टिरक्षक अंबाती रायुडूच्या हातात झेपावला. मात्र, कोणीही अपील केली नाही. अल्ट्रा एजमध्ये चेंडू लुईसच्या बॅटला लागल्याचे दिसताच भज्जीनं डोक्यावर हात मारला.

IPL 2019 CSK vsMI : मुंबईचाइव्हानलुईसआऊटहोता, पणधोनीनसल्यानंतोवाचला...https://t.co/p49fiesOrc@msdhoni@mipaltan@ChennaiIPL#CSKvsMI@harbhajan_singh@IPL

— Lokmat(@MiLOKMAT) April 26, 2019  
रोहित-लुईस जोडीनं चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी आळीपाळीनं चेन्नईच्या गोलंदाजांवर प्रहार केला. पण, 13व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ही जोडी तुटली. मिचेल सँटनरने लुईसला बाद केले. लुईसने 30 चेंडूंत 32 धावा केल्या. रोहित-लुईसने 75 धावांची भागीदारी केली आणि यंदाच्या हंगामातील मुंबई इंडियन्सकडून ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. रोहितने त्याच षटकात यंदाच्या मोसमातील पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 37 चेंडूंत हे अर्धशतक पूर्ण केले. चेन्नईविरुद्ध त्याचे हे सातवे अर्धशतक आहे आणि चेन्नईविरुद्ध फलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. 


इम्रान ताहीरने मुंबईच्या कृणाल पांड्याला (1) बाद केले. मुंबईच्या 14 षटकांत 3 बाद 103 धावा झाल्या होत्या. सँटनरने रोहितला बाद केले. रोहितने 48 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचून 67 धावा केल्या. त्यानंतर हार्दिक पांड्या व किरॉन पोलार्डकडून आतषबाजीची अपेक्षा होती, परंतु चेन्नईच्या गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. 

Web Title: IPL 2019 CSK vs MI: Mumbai Indians set 156 runs target to Chennai Super Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.