01 Apr, 19 12:10 AM
चेन्नईचा आठ धावांनी विजय
हेंद्रसिंग धोनीची धडाकेबाज खेळी आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थानव रॉयल्सवर आठ धावांनी विजय मिळवला. धोनीच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईचा 175 धावा उभारता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 167 धावा करता आल्या. चेन्नईने सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
01 Apr, 19 12:03 AM
बेन स्टोक्स आऊट
स्टोक्सच्या रुपात राजस्थानला मोठा धक्का बसला. स्टोक्सने २६ चेंडूंत ४६ धावा केल्या.
01 Apr, 19 12:01 AM
राजस्थानला विजयासाठी १२ धावांची गरज
बेन स्टोक्सने दमदार फटकेबाजी केल्यामुळे राजस्थानला जिंकण्यासाठी एका षटकात १२ धावांची गरज आहे.
31 Mar, 19 11:43 PM
राजस्थानला सहावा धक्का
के. गौतमच्या रुपात राजस्थानला सहावा धक्का बसला. गौतमने ८ चेंडूंत ९ धावा केल्या.
31 Mar, 19 11:27 PM
राजस्थानला पाचवा धक्का
स्टीव्हन स्मिथच्या रुपात राजस्थानला पाचवा धक्का बसला. स्मिथने ३० चेंडूंत २८ धावा केल्या.
31 Mar, 19 11:11 PM
राजस्थानला चौथा धक्का
राजस्थानला राहुल त्रिपाठीच्या रुपात चौथा धक्का बसला. राहुलने २४ चेंडूंत ३९ धावा केल्या.
31 Mar, 19 10:37 PM
राजस्थानला तिसरा धक्का
चेन्नईच्या शार्दुल ठाकूरने जोस बटलरला आऊट करत राजस्थानला तिसरा धक्का दिला.
31 Mar, 19 10:36 PM
राजस्थानला दुसरा धक्का
संजू सॅमसनच्या रुपात राजस्थानला दुसरा धक्का बसला. संजूने आठ धावा केल्या.
31 Mar, 19 10:35 PM
राजस्थानला पहिला धक्का
कर्णधार अजिंक्य रहाणेच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. अजिंक्यला एकही धाव करता आली नाही.
31 Mar, 19 09:48 PM
चेन्नईला पाचवा धक्का
ब्राव्होच्या रुपात चेन्नईला पाचवा धक्का बसला. ब्राव्होने १६ चेंडूंत २७ धावा केल्या.
31 Mar, 19 09:47 PM
धोनीचे २१ वे अर्धशतक
धोनीने यावेळी चौकारासर अर्धशतक पूर्ण केले. धोनीने ३९ चेंडूंत ५३ धावा पूर्ण केल्या.
31 Mar, 19 09:26 PM
सोळाव्या षटकात चेन्नईचे शतक
चेन्नईने सोळाव्या षटकात आपले शतक पूर्ण केले. सोळाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनीने एकेरी धाव घेत संघाचे शतक फलकावर लावले.
31 Mar, 19 09:17 PM
चेन्नईला चौथा धक्का
सुरेश रैनाच्या रुपात चेन्नईला चौथा धक्का बसला. रैनाने ३२ चेंडूंत ३६ धावा केल्या.
31 Mar, 19 08:51 PM
चेन्नई 9 षटकांत 3 बाद ४५
चेन्नईचे पहिले तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर धोनी आणि रैना यांनी संघाला सारवले. त्यामुळे ९ षटकांत चेन्नईला ४५ धावा करता आल्या.
31 Mar, 19 08:30 PM
केदार जाधव आऊट
केदार जाधवच्या रुपात चेन्नईला तिसरा धक्का बसला. केदारने तीन चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने ८ धावा केल्या.
31 Mar, 19 08:26 PM
शेन वॉटसन आऊट
शेन वॉटसनच्या रुपात चेन्नईला दुसरा धक्का बसला. वॉटसनला यावेळी १३ धावा करता आल्या.
31 Mar, 19 08:24 PM
अंबाती रायुडू आऊट
अंबाती रायुडूच्या रुपात चेन्नईला पहिला धक्का बसला. रायुडूला फक्त एकच धाव करता आली.
31 Mar, 19 07:41 PM
राजस्थानने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकाराले आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे.
31 Mar, 19 07:32 PM
राजस्थानचा संघ स्टेडियममध्ये दाखल, पाहा हा व्हिडीओ