चेन्नई, आयपीएल 2019 : चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आजीच्या निधनामुळे केन विलियम्सनला आजच्या सामन्याला मुकावे लागले. त्यामुळे त्याच्या जागी हैदराबाद संघाने अष्टपैलू शकीब अल हसनला संधी देण्यात आली. चेन्नईनेही शार्दूल ठाकूरच्या जागी हरभजन सिंगला संधी दिली. भज्जीनं पहिल्याच षटकात हैदराबादच्या सलामीवीर जॉनी बेअरस्टोला बाद केले. महेंद्रसिंग धोनीनं यष्टिमागे त्याचा सुरेख झेल टिपला. मनिष पांडेला आज फलंदाजीत बढती मिळाली. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.
बेअरस्टोचा हा अखेरचा सामना ठरणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या तयारीसाठी प्रत्येक संघाने आपापल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी डेडलाइन दिली आहे. त्यानुसार इंग्लंडचे खेळाडू 25 एप्रिलला मायदेशात परतणार आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या संघातील सदस्य बेअरस्टोला मायदेशी परतावे लागणार आहे. इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघात त्याचा समावेश आहे आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या डेडलाईननुसार चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा आजचा सामना हा आयपीएलमधील अखेरचा आहे.
पाहा जॉनी बेअरस्टोची विकेटhttps://www.iplt20.com/video/177985
इंग्लंड - जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जो रूट, इयॉन मॉर्गन ( कर्णधार), बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, ख्रिस वोक्स, लिएम प्लंकेट, आदील रशीद, मार्क वूड, अॅलेक्स हेल्स. टॉम कुरन, जो डेन्ली, डेव्हिड विली