23 Apr, 19 11:34 PM
चेन्नईचा 6 गडी राखून विजय
23 Apr, 19 11:31 PM
चेन्नईला चौथा धक्का; रायुडू 21 धावांवर बाद
23 Apr, 19 11:27 PM
शेवटच्या षटकात चेन्नईला 9 धावांची गरज
23 Apr, 19 11:24 PM
चेन्नईला विजयासाठी 2 षटकांत 13 धावांची गरज
23 Apr, 19 11:23 PM
वॉटसन 96 धावांवर बाद
23 Apr, 19 11:17 PM
17 व्या षटकानंतर चेन्नई 2 बाद 160; विजयासाठी 16 धावांची गरज
23 Apr, 19 11:10 PM
चेन्नईला विजयासाठी 4 षटकांत 26 धावांची गरज
23 Apr, 19 11:05 PM
15 व्या षटकानंतर चेन्नई 2 बाद 135
23 Apr, 19 11:01 PM
14 व्या षटकाअखेरीस चेन्नई 2 बाद 125; वॉटसन 67, तर रायुडू 12 धावांवर नाबाद
23 Apr, 19 10:43 PM
चेन्नईला विजयासाठी हव्यात 60 चेंडूंत 96 धावा
23 Apr, 19 10:42 PM
दहाव्या षटकात ही जोडी तुटली. रशीद खानने चेन्नईच्या रैनाला यष्टिचीत करून माघारी पाठवले. रैनाने 24 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 38 धावा केल्या.
23 Apr, 19 10:36 PM
वॉटसनला जीवदान
नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकडून वॉटसनचा झेल सुटला. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू वॉटसनच्या बॅटला चाटून यष्टिमागे गेला, परंतु बेअरस्टोपासून तो लांबच होता. तरीही बेअरस्टोने तो टिपण्याचा प्रयत्न केला.
23 Apr, 19 10:32 PM
हूडाने केले फॅफला चालते.. Video
https://www.iplt20.com/video/178226/hooda-sends-faf-back-in-the-hood
23 Apr, 19 10:22 PM
23 Apr, 19 10:21 PM
लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने थोडी सावधच सुरुवात केली. मात्र, तिसऱ्याच षटकात त्यांना धक्का बसला. सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस (1) धावबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांनी चेन्नईच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. सहाव्या षटकात रैनाने हैदराबादच्या संदीप शर्माच्या गोलंदाजीवर 22 धावा ( 4 चौकार व 1 षटकार) धावा चोपल्या. चेन्नईने 6 षटकांत 49 धावा केल्या.
23 Apr, 19 10:15 PM
23 Apr, 19 09:28 PM
23 Apr, 19 09:27 PM
विजय शंकरनेही दुसऱ्या बाजूनं आक्रमक खेळ केला. 79 धावांवर असताना पांडेला जीवदान मिळाले. दीपक चहरच्या गोलंदाजीवर सुरेश रैनाने सोपा झेल सोडला.
23 Apr, 19 09:05 PM
हरभजन सिंगने ही जोडी तोडली. त्याच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंग धोनीनं वॉर्नरला यष्टिचीत केले. वॉर्नरने 45 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार खेचून 57 धावा केल्या.
23 Apr, 19 08:58 PM
डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे 43वे अर्धशतक ठरले. चेन्नईविरुद्ध त्याचे हे सहावे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह त्याने शिखर धवन, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. पांडेचे हे आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने 2016मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध 26 चेंडूंत 50 धावांची खेळी केली होती.
23 Apr, 19 08:56 PM
डेव्हिड वॉर्नरचेही अर्धशतक, आयपीएलमधील त्याचे हे 43वे अर्धशतक
23 Apr, 19 08:53 PM
पांडेने 25 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
23 Apr, 19 08:52 PM
मनिष पांडेला आज फलंदाजीत बढती मिळाली. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पांडेने या संधीचा चांगला उपयोग केला. त्याने डेव्हिड वॉर्नरसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीनं हैदराबाद संघाला 10 षटकांत 1 बाद 91 धावांपर्यंत मजल मारून दिली.
23 Apr, 19 08:34 PM
23 Apr, 19 08:10 PM
चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आजीच्या निधनामुळे केन विलियम्सनला आजच्या सामन्याला मुकावे लागले. त्यामुळे त्याच्या जागी हैदराबाद संघाने अष्टपैलू शकीब अल हसनला संधी देण्यात आली. चेन्नईनेही शार्दूल ठाकूरच्या जागी हरभजन सिंगला संधी दिली. भज्जीनं पहिल्याच षटकात हैदराबादच्या सलामीवीर जॉनी बेअरस्टोला बाद केले. महेंद्रसिंग धोनीनं यष्टिमागे त्याचा सुरेख झेल टिपला.
23 Apr, 19 08:01 PM
23 Apr, 19 07:38 PM
हैदराबादच्या केन विलियम्सनच्या जागी अष्टपैलू शकीब अल हसनला संधी
डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, विजय शंकर, मनिष पांडे, शकीब अल हसन, युसूफ पठाण, दीपक हुडा, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा
23 Apr, 19 07:37 PM
चेन्नईच्या संघात एक बदल, शार्दूल ठाकूरच्या जागी हरभजन सिंग संघात
शेन वॉटसन, फॅफ ड्यु प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ड्वॅन ब्राव्हो, हरभजन सिंग, दीपक चहर, इम्रान ताहीर
23 Apr, 19 07:17 PM
हरभजन सिंगचा ट्रम्प कार्ड चेन्नई वापरणार?
23 Apr, 19 07:12 PM
IPL 2019 : धडाकेबाज धोनीला रोखण्यासाठी हैदराबादचा मास्टर प्लान
23 Apr, 19 07:11 PM
IPL 2019 : चेन्नई-हैदराबाद सामना कर्णधारांशिवाय, जाणून घ्या कारण