हैदराबाद, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सनरायझर्स हैदराबादला अपेक्षित सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना विक्रमाला गवसणी घातली. वॉर्नर व बेअरस्टो यांनी आयपीएलमध्ये सलग तीन सामन्यांत शतकी भागीदारी करण्याचा विक्रम केला, अशी कामगिरी करणारी ही पहिलीच जोडी ठरली.
मोईन अलीच्या पहिल्याच षटकात या जोडीनं 14 धावा काढल्या. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. हैदराबादच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना 6 षटकांत 59 धावा चोपल्या. या दोघांची ही आयपीएलमधील तिसरी अर्धशतकी भागीदारी ठरली. वॉर्नर - बेअरस्टो ही आंतरराष्ट्रीय अनुभव असलेली जोडी समोर असूनही 16 वर्षीय प्रयास रे बर्मनने चोख गोलंदाजी केली. त्यानं पहिल्याच षटकात केवळ 6 धावा दिल्या. बेअरस्टोनं अर्धशतक पूर्ण करताना संघालाही शतकी पल्ला पार करून दिला. हैदराबादने 10 षटकांत बिनबाद 105 धावा केल्या.
Web Title: IPL 2019: David Warner and Johnny Bairstow becomes the first pair in IPL to score three consecutive 100+ partnership
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.