IPL 2019 : वॉर्नरचे झोकात पुनरागमन, हैदराबादच्या 181 धावा

IPL 2019 : वॉर्नरचे झोकात पुनरागमन, हैदराबादच्या 181 धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 05:31 PM2019-03-24T17:31:13+5:302019-03-24T17:44:23+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: David Warner comeback with smashing 85 runs, SRH make 181 runs | IPL 2019 : वॉर्नरचे झोकात पुनरागमन, हैदराबादच्या 181 धावा

IPL 2019 : वॉर्नरचे झोकात पुनरागमन, हैदराबादच्या 181 धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता, आयपीएल 2019 : डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी सनरायझर्स हैदराबादला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना कोलाकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांना हतबल केले. वॉर्नरला पाचव्या षटकात दिलेले जीवदान कोलकाताला महागात पडले. 13व्या षटकात अखेर कोलकाताला पहिले यश मिळाले, पियुष चावलाने हैदराबादच्या सलामीवीर जॉनी बेअरस्टोला त्रिफळाचीत केले आणि डेव्हिड वॉर्नरसोबतची 118 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. हैदराबादने 20 षटकांत 3 बाद 181 धावा केल्या. 



केन विलियम्सनला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावे लागले आणि भुनेश्वर कुमारकडे नेतृत्वाची धुरा आली. कोलकाताने नाणेफेकीचा कौल जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. चेंडु कुरतडण्याप्रकरणी एका वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या वॉर्नरने कोलकाताच्या गोलंदाजांची धुलाई केली. वॉर्नरने 31 चेंडूंत अर्धशतक केले. त्याला जॉनी बेअरस्टोने उत्तम साथ दिली. त्याने 35 चेंडूंत 39 धावा केल्या, परंतु त्याला 13व्या षटकात पियुष चावलाने बाद केले. 


16व्या षटकात वॉर्नरचे वादळ थांबवण्यात कोलकाताला यश आले. आंद्रे रसेलने वॉर्नरला बाद केले. वॉर्नरने 53 चेंडूंत 9 चौकार व 3 षटकारांसह 85 धावा कुटल्या. 


त्यानंतर हैदराबादच्या धावांचा वेग मंदावला. त्यांना 181 धावांवर समाधान मानावे लागले. विजय शंकरने अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी करताना 40 धावा केल्या. 

Web Title: IPL 2019: David Warner comeback with smashing 85 runs, SRH make 181 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.