हैदराबाद, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील जेता कोण, हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होईल. आयपीएलमधील दोन तगडे संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील हायव्होल्टेज सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. यंदाच्या हंगामात उभय संघांत झालेल्या तीनही सामन्यांत रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने बाजी मारली आहे. त्यामुळे अंतिम फेरीतही मुंबईचा संघ महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईला पराभूत करून जेतेपदाचा चौकार मारेल, अशी अनेकांना खात्री आहे. त्यात डेव्हीड वॉर्नरला ऑरेंज कॅप मिळणार असल्याने मुंबईच्या विजयाच्या आशा अनेक पटीने वाढल्या आहेत.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात भिडणार आहेत आणि आतापर्यंत झालेल्या तीन फायनलमध्ये चेन्नईला दोनवेळा हार पत्करावी लागली आहे. त्यात दोन्ही संघांच्या नावावर प्रत्येकी तीन जेतेपद आहेत. चेन्नईने 2010, 2011 आणि 2017मध्ये, तर मुंबईने 2013, 2015 व 2018 मध्ये जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे यंदा कोणाचे पारडे जड असेल, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. पण, मुंबईचे जेतेपद आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात एक साम्य आहे आणि त्यात तथ्य असल्यास मुंबईचे जेतेपद यंदाही पक्के होईल.
चेन्नईने आयपीएलमध्ये सर्वाधिक 8 वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर मुंबई इंडियन्स पाचव्यांदा फायनल खेळणार आहे. रोहितने आयपीएलच्या अंतिम सामन्यात एकदाही पराभव पत्करलेला नाही. त्याने 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून आणि 2013, 2015 व 2017 मध्ये मुंबई इंडियन्सकडून जेतेपदाचा चषक उंचावला आहे. मुंबईने जिंकलेल्या तीनही जेतेपदाच्यावेळी ऑरेंज कॅप पटकावणारा खेळाडू हा ऑस्ट्रेलियाचाच राहिला आहे. पण, 2013 आणि 2015 मध्ये वॉर्नर आणि मुंबई इंडियन्स हे समीकरण जुळले आहे. त्यामुळे याच निकषावर मुंबई यंदाही जेतेपदाचा चषक उंचावेल, अशी अपेक्षा आहे.
वॉर्नरने 2015 मध्ये 14 सामन्यां 7 अर्धशतकांसह 562 धावा, तर 2017 मध्ये 14 सामन्यांत 4 अर्धशतकं व 1 शतकासह 641 धावा करत ऑरेंज कॅप नावावर केली होती. यंदाही ऑरेंज कॅप ही वॉर्नरलाच मिळणार आहे. त्याने 12 सामन्यांत 8 अर्धशतकं व 1 शतकासह 692 धावा चोपल्या आहेत. त्याच्या जवळपासही कुणी नाही. त्यामुळे 2013 व 2015 प्रमाणे वॉर्नर यंदाही मुंबई इंडियन्ससाठी 'लकी बॉय' ठरेल का?
IPL मधून माघार तरीही 'ऑरेंज कॅप' डेव्हिड वॉर्नरचीच!
IPL 2019 : मुंबई इंडियन्स 'हुकुमी एक्का' मैदानात उतरवणार, CSKची चिंता वाढणार
IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा 'गेम प्लान' चेन्नईच्या हाती, CSKचा मास्टर स्ट्रोक
IPL 2019 : मुंबई इंडियन्स सज्ज रहा, आम्ही येतोय; भज्जी-ब्राव्होचं आव्हान
IPL 2019 : फायनलपूर्वी रोहित शर्माची उजळणी, मुंबई इंडियन्सच्या 'थ्री पिलर्स'चे मानले आभार
दिग्गज रिचर्ड्स यांचा CSKला सल्ला, मुंबईच्या 'या' दोन खेळाडूंपासून सावध राहा!
IPL 2019 : मुंबई आणि चेन्नई फायनलमध्ये टॉस ठरणार निर्णायक
Web Title: IPL 2019: David Warner Mumbai Indian's 'Lucky Boy', know How!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.