IPL 2019 : डी'कॉकचे अर्धशतक, मुंबईचे हैदराबादपुढे 163 धावांचे आव्हान

क्विंटन डी'कॉकने मात्र एकबाजू लावून धरली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 09:40 PM2019-05-02T21:40:38+5:302019-05-02T21:48:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: D'coc half-century, Mumbai's challenge of 163 runsIPL 2019:Quinton de Kock half century, Mumbai Indians given 163 runs target to Sunrisers Hyderabad | IPL 2019 : डी'कॉकचे अर्धशतक, मुंबईचे हैदराबादपुढे 163 धावांचे आव्हान

IPL 2019 : डी'कॉकचे अर्धशतक, मुंबईचे हैदराबादपुढे 163 धावांचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल २०१९ : क्विंटन डी'कॉकच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सलासनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. डी'कॉकने ५८ चेंडूंत ६८ धावांची खेळी साकारली. या खेळीमध्ये डी'कॉकने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले.



 

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि क्विंटन डी'कॉक यांनी चांगली सुरुवात केली. पण आक्रमक खेळणाऱ्या रोहितला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. रोहितच्या रुपात मुंबईला मोठा धक्का बसला. रोहितला २४ धावा करता आल्या.



 

रोहित बाद झाल्यावर क्विंटन डी'कॉकने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. रोहितनंतर सूर्यकुमार यादव, इव्हिन लुईस आणि हार्दिक पंड्या बाद झाले, पण क्विंटन डी'कॉकने मात्र एकबाजू लावून धरली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.



Web Title: IPL 2019: D'coc half-century, Mumbai's challenge of 163 runsIPL 2019:Quinton de Kock half century, Mumbai Indians given 163 runs target to Sunrisers Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.