मोहाली, आयपीएल 2019 : पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने हैदराबाद सनरायझर्सवर विजय मिळवला. पृथ्वीने 56 धावांची खेळी साकारत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर पंतने अखेरच्या षटकात धडाकेबाज फलंदाजी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
वृद्धिमान साहाला पहिल्याच चेंडूवर दिले आऊट, तरी तो नाबाद ठरला, पाहा व्हिडीओदिल्ली-हैदराबाद यांच्यातील एलिमिनेटर सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर एक नाट्य पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादकडून ट्रेंट बोल्ट पहिले षटक टाकत होता, तर दिल्ली कॅपिटल्सचा वृद्धिमान साहा बॅटींग करत होता. यावेळी पंचांनी साहाला आऊट दिले, पण साहा त्यानंतरही खेळत होता.
बोल्टने पहिलाच चेंडू अचूक टाकला. हा चेंडू साहाच्या पॅडला लागल्याचे दिसत होते. दिल्लीच्या संघाने जोरदार अपील केली आणि पंचांनीही साहाला बाद असल्याचे सांगितले. त्यानंतर नाट्याला सुरुवात झाली. साहाने सलामीवीर मार्टिन गप्तीलशी चर्चा केली आणि त्यानंतर डीआएस घेतला. डीआरएसमध्ये बोल्टचा चेंडू साहाच्या बॅटला लागल्याचे दिसत होते. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी साहाला नाबाद ठरवले. त्यामुळे मैदानावरील पंचांनी पहिल्याच चेंडूवर बाद दिलेला साहा हा नाबाद ठरला.
अमित मिश्राचा मैदानात भन्नाट डान्स, व्हिडीओ वायरलसनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये एलिमिनेटरचा सामना सुरु आहे. या सामन्यात खेळाव्यतिरीक्त एक गोष्ट चांगलीच लक्षवेधी ठरली. आणि ती गोष्ट आहे अमित मिश्राचा डान्स.
या सामन्यात मिश्राने हैदराबादच्या मार्टिन गप्तिलला मिश्राने बाद केले. यानंतर मिश्राने मैदानात एक भन्नाट डान्स केला. त्यानंतर मिश्राजी का डान्स देखो, अशा कमेंट चाहत्यांनी केल्या.
हा पाहा मजेशिर व्हिडीओ