Join us  

IPL 2019: स्वत:चे नशीब स्वत:च ठरवू शकता- डिव्हिलियर्स

आयपीएल आम्ही कमनशिबी ठरलो. जास्तीत जास्त सामने चुरशीचे होत असलेल्या स्पर्धेत असे घडणे स्वाभाविक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 3:07 AM

Open in App

एबी डिव्हिलियर्स लिहितात...आयपीएल आम्ही कमनशिबी ठरलो. जास्तीत जास्त सामने चुरशीचे होत असलेल्या स्पर्धेत असे घडणे स्वाभाविक आहे. जर निकाल प्रतिकूल लागत असेल, तर पराभूत संघांसाठी आणि निराश पाठिराख्यांसाठी बोलण्यास ही एकच बाब असते. माझा विचार केला तर मी बॅड लकवर फार विश्वास ठेवत नाही. क्रिकेटच्या मैदानावरही नाही आणि जीवनातील कुठल्याही क्षणावर नाही. जसे अनेक लोक म्हणतात की, तुम्ही स्वत:चे नशीब स्वत:च लिहिता.जय-पराजयाचे अंतर फार कमी आहे. आयपीएलमध्ये कुठल्याही लढतीचा निकाल तेव्हाच निश्चित होतो, ज्यावेळी चेंडू सीमारेषेजवळ कुठल्या क्षेत्ररक्षकाच्या थोड्या दूर असते किंवा थेट फेकीवर फलंदाज क्रिजच्या बाहेर असतो. आंद्रे रसेल आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यासारख्या मास्टर ब्लास्टर फलंदाजांसाठी प्रति षटक २० धावा फटकावणेही सोपे वाटते. अनेकदा षटकार आणि बाद होण्याच्या अंतरामध्ये ते चुकीच्या बाजूने उभे असल्याचे दिसते. ते अन्य खेळाडूंच्या तुलनेत अधिक नशीबवान नसतात, पण ते अधिक प्रतिभावान नक्कीच आहेत. कदाचित नशीबाचा हवाला देणारे जे अनेक शब्द उच्चारल्या जातात ते माझ्या देशातील गोल्फर गॅरी प्लेयरचे आहेत.ज्यावेळी त्याला म्हटले की, तू नशीबवान आहेस की जेतेपद पटकावले. त्यावेळी त्याने अजब उत्तर दिले. तो म्हणाला, ‘जेवढा जास्त मी सराव करतो तेवढा अधिक नशीबवान ठरतो. तो १०० टक्के खरे बोलत होता. खेळ अथवा सर्वच विभागात जर तुम्ही कसून मेहनत घेतली, चांगली तयारी केली आणि त्याची योग्य अंमलबजावणी केली तर तुमचे नशीब तुम्ही स्वत:च ठरवू शकता. २०१९ मध्ये क्षेत्ररक्षणाचेही चकित करणारे आकडे आले आहेत. यात आघाडीवर असलेल्या संघांत आणि अन्य संघांमध्ये केवळ नशीबाचा फरक नाही तर सामूहिक इच्छाशक्ती, ऊर्जा आणि काही करण्याची मानसिकता याचा फरक आहे.किंग्स इलेव्हन पंजाब संघाला झेल टिपण्याच्या ४२ संधी मिळाल्या. त्यात त्यांनी ८८.१० टक्के यश मिळवताना ३७ झेल टिपले. सीएसकेने ६५ पैकी ५७ झेल टिपले. यात त्यांची टक्केवारी ८७.७० अशी आहे. निश्चितच हा योगायोग नाही. क्षेत्ररक्षण चांगले असलेले संघ गुणतालिकेत आघाडीवर आहेत. आरसीबी संघात आम्हाला कल्पना आहे की, क्षेत्ररक्षणादरम्यान आम्ही ५० पैकी ३० झेल टिपण्यात यशस्वी ठरलो. आमची टक्केवारी ६० टक्के आहे. ही नक्कीच स्वीकारार्ह कामगिरी नाही. आम्ही यात सुधारणा करण्यासाठी कसून मेहनत घेत आहोत. आम्ही बुधवारी बेंगळुरूमध्ये किंग्स इलेव्हनविरुद्ध यात सुधारणा करण्यास प्रयत्नशील राहू, अशी आशा आहे.

टॅग्स :आयपीएल 2019एबी डिव्हिलियर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर