IPL 2019: धोनी vs कोहली, कोणाचे पारडे आहे भारी...

चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात आतापर्यंत 23 सामने खेळवले गेले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 06:31 PM2019-03-22T18:31:34+5:302019-03-22T18:32:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: Dhoni vs Kohli, Whose Side Is Heavy ... | IPL 2019: धोनी vs कोहली, कोणाचे पारडे आहे भारी...

IPL 2019: धोनी vs कोहली, कोणाचे पारडे आहे भारी...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12व्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना खेळवण्यात येणार आहे. 2018 साली आयपीएलमध्ये कमबॅक करताना ऐटीत जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईचा संघ यंदाही जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. पण आतापर्यंत या दोन संघांमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये नेमके कोणत्या संघाचे पारडे जड आहे, ते जाणून घ्या...

चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात आतापर्यंत 23 सामने खेळवले गेले. या 23 सामन्यांपैकी 15 सामन्यांमध्ये चेन्नईने विजय मिळवला आहे. तर बंगळुरूला सात सामने जिंकता आलेले आहेत, यामध्ये एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही.


एकूण सामने: 23*
चेन्नई विजयी: 15
बंगळुरू विजयी : 7
निकाल नाही: 1.

दोन्ही संघांमध्ये चेन्नईमध्ये सात सामने खेळले गेले. या सात सामन्यांपैकी सहा सामने चेन्नईने जिंकले आहेत, तर फक्त एकच सामना बंगळुरुला जिंकता आला आहे. बंगळुरुमध्ये दोन्ही संघांत आठ सामने खेळवले गेले. या आठ सामन्यांमध्ये चेन्नईने चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर बंगळुरुला तीन सामने जिंकता आले आहेत. दोन्ही संघांमध्ये तटस्थ ठिकाणी आठ सामने खेळवले गेले, यामध्ये चेन्नईला पाच आणि बंगळुरुला तीन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. दोन्ही संघांतील सामन्यांमध्ये सर्वाधिक लढती चेन्नईच्या सुरेश रैना आणि विराट कोहली यांच्या नावावर आहेत. दोघांनी आतापर्यंत प्रत्येकी 22 सामने खेळले आहेत. 

चेन्नईचे सामने कधी व कोठे?
23 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू, चेन्नई
26 मार्च : दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
31 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, चेन्नई
3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई 
6 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई
9 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, चेन्नई
11 एप्रिल :  राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, जयपूर
14 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता
17 एप्रिल :  सनराइझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद
21 एप्रिल :  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू
23 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. सनराइझर्स हैदराबाद, चेन्नई
26 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
1 मे : चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई
5 मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स , मोहाली
 
चेन्नई सुपर किंग्सचा संघ
महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, फॅफ ड्यू प्लेसिस, मुरली विजय, रवींद्र जाडेजा, सॅम बिलिंग, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एनगिडी, इम्रान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायुडू, हरभजन सिंग, दीपक चहर, के एम आसीफ, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, कर्ण शर्मा, ध्रुव शोराय, एन जगदीशन, शार्दूल ठाकूर, मोनू कुमार, चैतन्य बिशोनी

Web Title: IPL 2019: Dhoni vs Kohli, Whose Side Is Heavy ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.