हैदराबाद, आयपीएल २०१९ : महेंद्रसिंग धोनी हा किती चाणाक्ष कर्णधार आहे, हे सर्वांनाच सुपरिचीत आहे. पण या गोष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा क्रिकेट जगताला आला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये 'क्वालिफायर-२' हा सामना रंगला होता. या सामन्यात चेन्नईने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. पण या सामन्यात धोनीची चतुराई पुन्हा एकदा पाहायला मिळाली. या सामन्यात धोनीने डीआरएसचा निर्णय घेतला आणि त्यानंतर DRS = धोनी रीव्ह्यू सिस्टीम, असे चाहते पुन्हा एकदा म्हणायला लागले.
दिल्ली आणि चेन्नईतील सामन्यातील तिसऱ्या षटकात ही गोष्ट घडली. हे षटक चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहर टाकत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चहरने दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला चकवले. हा चेंडू थेट पृथ्वीच्या पायावर आदळला. त्यावेळी दीपक चहरने पायचीतची जोरदार अपील केली. पण पंचांनी यावेळी हे अपील फेटाळले आणि पृथ्वीला नाबाद ठरवले. यावेळी साऱ्यांच्या नजरा धोनीकडे वळल्या. धोनीने थोडा विचार करून डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला.
धोनीने डीआरएसचा निर्णय घेतल्यावर साऱ्यांनीच धोनीला याबाबत विचारणा केली. धोनी नेहमीप्रमाणे शांत होता. तिसऱ्या पंचांनी यावेळी निर्णय घेण्यासाठी रीप्ले पाहिला. त्यावेळी धोनीने घेतलेला निर्णय किती होता, हे दिसून आले.
हा पाहा व्हिडीओ
'पापा द ग्रेट' धोनीला गोंडस झीवाकडून विजयाचं 'गोड' गिफ्ट गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या १२ व्या मोसमाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आयपीएलच्या १० हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या संघाने आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मान पटकावला. चेन्नईने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ६ विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यातील विजयानंतर धोनीला लेक झीवाने पापा देत 'गोड' गिफ्ट दिले. CSK च्या बहुतेक खेळाडूंनी सामन्यानंतर बच्चेकंपनीसोबत धमाल मस्ती केली. चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्यात जेतेपदाची लढत होणार आहे आणि आयपीएलचे जेतेपद चौथ्यांदा कोण पटकावतो याची उत्सुकता लागली आहे.
आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या दिल्लीनं सामन्याच्या पहिल्याच षटकात चेन्नई सुपर किंग्सच्या सलामीवीरांना बाद करण्याची सोपी संधी गमावली आणि त्यांचा आत्मविश्वासही हरवला. फॅफ ड्यू प्लेसिस आणि शेन वॉटसन यांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावून चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. अन्य फलंदाजांनी त्यावर कळस चढवत चेन्नईला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. चेन्नईचा हा आयपीएलमधील 100 वा विजय ठरला. मुंबई इंडियन्सनंतर विजयाचे शतक पूर्ण करणारा हा दुसरा संघ ठरला. चेन्नईने 164 सामन्यांत 100 विजय मिळवले.