Join us  

IPL 2019 : आरसीबी की 'हार'सीबी, पराभवाच्या डबल हॅट्ट्रिकनंतर विराट कोहली होतोय ट्रोल

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सहा पैकी एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 5:03 PM

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सहा पैकी एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे हा आरसीबीचा संघ म्हणजे 'हार'सीबी आहे, असे म्हटले जात आहे. पराभवाच्या डबल हॅट्ट्रिकनंतर विराट कोहली सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे.

मुंबईकरांनी वाजवले कोहलीचे बारा; बंगळुरूचा पराभवाचा षटकारश्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ या मुंबईकर खेळाडूंनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे बारा वाजवले. या जोडीने दमदार फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सला 4 विकेट राखून विजय मिळवून दिला. बंगळुरूचा हा सलग सहावा पराभव ठरल्याने प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. 149 धावांचा पाठलाग करताना पृथ्वीने 28, तर अय्यरने 67 धावांची खेळी केली. दिल्लीने हे लक्ष्य 18.5 षटकांत पूर्ण केले.

रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या मात्तबर फलंदाजांना पुन्हा एकदा अपयश आल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहली वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही. कोहलीनेही 41 धावा करण्यासाठी 33 चेंडूंचा सामना केला. बंगळुरूने निर्धारीत 20 षटकांत 8 बाद 149 धावा केल्या आहेत. कागिसो रबाडाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. त्याने एकाच षटकात बंगळुरूच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले.  

लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला पहिल्याच षटकात धक्का बसला. टीम साउदीने दुसऱ्याच चेंडूवर शिखर धवनला बाद केले. अखेरच्या चेंडूवर श्रेयस अय्यरचा झेल यष्टिरक्षक पार्थिव पटेलने सोडला. बंगळुरूला पहिल्याच षटकात यश मिळवून देणाऱ्या साउदीला मात्र तिसऱ्या षटकात पृथ्वी शॉने बदडवले. साउदीला त्याने सलग पाच चेंडूंत चौकार ठोकले. पाचवा चौकार हा पंचांनी लेग बाय दिला. पृथ्वी आणि श्रेयस अय्यर यांनी दिल्लीच्या डावाला आकार दिला आणि त्यामुळे दिल्लीने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 53 धावांपर्यंत मजल मारली. पवन नेगीने बंगळुरूला यश मिळवून दिले. त्याने पृथ्वीला बाद केले. पृथ्वीन 22 चेंडूंत 28 धावा केल्या. श्रेयस अय्यरला जीवदान. पवन नेगीने टाकलेल्या 11 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अय्यरचा झेल पार्थिव पटेलने सोडला.अय्यरने कॉलीन इंग्रामसह दिल्लीची लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरूच ठेवली. या दोघांनी बंगळुरूच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 14व्या षटकात दिल्लीला आणखी एक धक्का बसला. इंग्राम 22 धावांवर मोइन अलीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. अय्यरने 37 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमधली त्याचे 11 वे अर्धशतक ठरले. अय्यरने 50 चेंडूंत 67 धावा केल्या. त्यात 8 चौकार व 2 षटकारांचा समावेश आहे. 

RCBच्या विजयावर खवय्यांच्या पैजा; नशिबाने उपासमारीची वेळ टळलीभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न पाहत आहे. त्याच्या चाहत्यांचा असा दावा आहे की कोहलीने फक्त इंग्लंडमध्ये जाऊन वर्ल्ड कप आणायचा आहे. पण वर्ल्ड कप पूर्वीच्या ऑस्ट्रेलिया मालिकेत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आणि आता इंडियन प्रीमिअर लीगमध्येही कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघावर सलग सहा सामन्यांत पराभवाची नामुष्की ओढवली आहे. वर्ल्ड कप मोहीम आणि आयपीएल याची तुलना योग्य नव्हे, परंतु आयपीएलमध्ये कोहलीच्या नेतृत्व कौशल्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

कोहलीच्या संघाच्या सततच्या पराभवावर आता सोशल मीडियावर खवय्यांच्या पैजा लागू लागल्या आहेत. RCB जिंकावा म्हणून दर्दी खवय्ये आपल्या सर्वात आवडत्या पदार्थाचा महिनाभरासाठी त्याग करायलाही तयार आहेत. बंगळूरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यापूर्वी अनेक खवय्यांनी RCB च्या विजयावर पैजा लावल्या. RCB जिंकल्यास महिनाभर पावभाजी, पाणी पूरी, पिझ्झा, मोमोज आदी पदार्थ खाणार नसल्याच्या या पैजा होत्या. आता या RCB च्या समर्थनात होत्या की कोहलीच्या नेतृत्वावर ( पराभूत होणार) असलेल्या विश्वासावर होत्या, देव जाणे. पण, बंगळूरू आणि दिल्ली यांच्या सामन्यातील निकालानंतर खवय्यांवरील उपासमारीची वेळ नक्की टळली. दिल्लीने चार विकेट राखून हा सामना जिंकला. 

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर