हैदराबाद - अत्यंत अटीतटीच्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या एका धावेने मात करत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा केला. निर्धारीत 20 षटकांमध्ये केवळ 149 धावाच जमवल्यानंतर 150 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत विजयश्री खेचून आणली. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा मेन्टॉर सचिन तेंडुलकर याने महेंद्र सिंह धोनीचे धावबाद होणे हे मुंबईच्या विजयात टर्निंग पॉइंट ठरल्याचे म्हटले आहे. मुंबईने विळवलेल्या रोमहर्षक विजयानंतर सचिन म्हणाला की, ''सामन्याच्या मध्यावर महेंद्रसिंग धोनीचे धावबाद होणे मुंबईच्या विजयात टर्निंग पॉईंट ठरले. तसेच जसप्रीत बुमराने केलेली गोलंदाजीसुद्धा महत्त्वपूर्ण ठरली. सुरुवातीच्या षटकांमध्ये लसिथ मलिंगा महागडा ठरला. मात्र बुमराने उणीव भरून काढली.'' यावेळी फिरकीपटू राहुल चहर आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचेही सचिनने कौतुक केले. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईने धडाकेबाज सुरुवात केली असली तरी रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर त्यांची धावगती थोडीशी मंदावली. अखेरीस कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2019 Final : सचिनच्या मते हा ठरला अंतिम सामन्यातील टर्निंग पॉईंट
IPL 2019 Final : सचिनच्या मते हा ठरला अंतिम सामन्यातील टर्निंग पॉईंट
अत्यंत अटीतटीच्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या एका धावेने मात करत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा केला.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 10:11 AM