जयपूर, आयपीएल 2019 : राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज जोफ्रा आर्चरसाठी आजचा दिवस फार चांगला राहिला नाही. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने क्विंटन डी कॉकचा एक आणि हार्दिक पांड्याचे दोन झेल सोडले. त्यामुळे तो स्वतःवर प्रचंड निराश दिसला, परंतु अखेरच्या षटकात त्याने हार्दिकला बाद करून चुकांची भरपाई केली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार खेळ केला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना अंबाती रायुडू व महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला. या दोघांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने राजस्थान रॉयल्ससमोर 162 धावांचे लक्ष्य ठेवले.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मुंबईला तिसऱ्याच षटकात झटका बसला. राजस्थानच्या श्रेयस गोपाळने तिसऱ्याच षटकात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला ( 5) बाद केले. . त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला जीवदान मिळाले. जोफ्रा आर्चरचा झेल घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र, पुढच्याच षटकात डी कॉकने सर्व दडपण झुगारून धवल कुलकर्णीच्या गोलंदाजाची धुलाई केली. डी कॉकने कुलकर्णीच्या त्या षटकात सलग तीन चौकार व एक षटकारासह 19 धावा चोपल्या. मुंबईने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 46 धावा केल्या. डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
पाहा व्हिडीओ...
https://www.iplt20.com/video/174573/jofra-s-forgetful-day-in-the-outfield?tagNames=indian-premier-league
17व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जोफ्रा आर्चरने मुंबईच्या हार्दिक पांड्याचा सोपा झेल सोडला. हार्दिकने टोलावलेला चेंडू आर्चरच्या हातात सहज झेपावला होता, परंतु तो हातात राखण्यात आर्चरला अपयश आले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर किरॉन पोलार्डने षटकार खेचला. पण जयदेव उनाडकटने ही कसर भरून काढली, पुढच्याच चेंडूवर उनाडकटने पोलार्डचा त्रिफळा उडवला. 19व्या षटकात पुन्हा आर्चरने पांड्याला जीवदान दिले. उनाडकटच्या गोलंदाजीवरच आर्चरने झेल सोडला आणि पांड्याने पुढच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. आर्चरने अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकला पायचीत केले. हार्दिकने 15 चेंडूंत 23 धावा केल्या.
पाहा व्हिडीओ...
https://www.iplt20.com/video/174585/jofra-archer-finally-redeems-himself?tagNames=indian-premier-league
Web Title: IPL 2019: final jofra archer succeed to get hardik pandya wicket, watch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.