मुंबई, आयपीएल : चेन्नई सुपर किंग्स हा केवळ संघ नाही तर एक कुटुंब आहे. त्यामुळेच या संघातील एकजुट कोणी मोडू शकत नाही. तरुणांसाठीच्या आयपीएलमध्ये CSKचा संघ हा तीशीपल्ल्याड खेळाडूंचा म्हणून ओळखला जातो. पण, वयासोबत येणारी प्रगल्भता आणि गाठीशी असलेला अनुभव या संघाला सर्वात वेगळा ठरवतो. त्यामुळेच आपल्या कुटुंबाला विजय मिळवून देण्यासाठी प्रत्येक खेळाडू सर्वतोपरी प्रयत्न करतो. याची प्रचिती अनेकदा आली आहे, परंतु आता समोर आलेल्या प्रसंगावरून CSKला का सर्वोत्तम म्हटले जाते, हे कळेल.
आम्ही एकमेकांकडे ट्रॉफी सोपवित आहोत - महेंद्रसिंग धोनी अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध एका धावेने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर प्रतिक्रिया देताना चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी म्हणाला,‘हा मजेदार खेळ असून, यात दोन संघ एकमेकांकडे ट्रॉफी सोपवीत असल्याचे दिसून येते.’ सुरुवातीला सामन्यात चेन्नईचे वर्चस्व होते. पण मधल्या षटकांमध्ये मुंबईने पुनरागमन केले. असे वाटत होते की, शेन वॉटसन पुन्हा एकदा चेन्नईला जेतेपद पटकावून देईल. पण जसप्रती बुमराह व लसिथ मलिंगाने शानदार गोलंदाजी करीत पारडे फिरवले. धोनी म्हणाला,‘आम्ही एकमेकांकडे ट्रॉफी सोपवीत आहो, हे रंगतदार आहे. दोन्ही संघांनी चुका केल्या, पण विजेत्या संघाने एक चूक कमी केली.’