Join us  

IPL 2019 : हुश्श... अखेर बंगळुरु जिंकली, पंजाबवर मात

कोहली आणि डी' व्हिलियर्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बंगळुरुने आठ विकेट्स राखत हा सामना जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:37 PM

Open in App

मोहाली, आयपीएल 2019 : विराट कोहली आणि एबी डी' व्हिलियर्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजय मिळवला. गेल्या सात सामन्यांमधला त्यांचा हा पहिला विजय ठरला.

 

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ख्रिस गेलच्या नाबाद 99 धावांच्या जोरावर 173 धावा केल्या होत्या. कोहली आणि डी' व्हिलियर्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बंगळुरुने आठ विकेट्स राखत हा सामना जिंकला. डी' व्हिलियर्सने 38 चेंडूंत नाबाद 59 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुची सुरुवात आश्वासक झाली नाही. पण त्यानंतर कोहली आणि डी' व्हिलियर्स  दमदार फलंदाजी करत संघाची गाडी रुळावर आणली. कोहलीने 53 चेंडूंत 67 धावा केल्या.किंग्ज इलेव्हन पंजाबचा ख्रिस गेलची धडाकेबाज फलंदाजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाली. गेलच्या फटकेबाजीमुळेच पंजाबला बंगळुरुपुढे 174 धावांचे आव्हान ठेवता आले. गेलने 64 चेंडूंत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद 99 धावा केल्या.

बंगळुरुने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. गेल आणि लोकेश राहुल यांनी या गोष्टीचा चांगला फायदा उचलला. या दोघांनी सहा षटकांमध्ये संघाला 60 धावांची सलामी दिली. त्यानंतर सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर लोकेश राहुलने षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या नादात युजवेंद्र चहलच्या चेंडूवर तो यष्टीचीत झाला. राहुल बाद झाल्या गेलने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. एका टोकाकडून फलंदाज बाद होत असले तरी गेलने मात्र धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी चोख बजावली.

जेव्हा गेल आणि चहल यांची धक्काबुक्की होते तेव्हाकिंग्ज इलेव्हन पंजाबचा ख्रिस गेल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा युजवेंद्र चहल यांना डोळ्यासमोर आणून बघा. या दोघांमध्ये जर धक्काबुक्की झाली तर काय होईल, हे आता तुमच्या डोळ्यापुढे आलेच असेल. पण असे घडल्याचे मोहालीच्या स्टेडियममध्ये पाहायला मिळाले आहे.

पंजाबच्या सलामीवीरांनी पहिल्या सहा षटकांमध्ये बळी न मिळवता 60 धावांची सलामी दिली. त्यानंतर सातव्या षटकामध्ये विराट कोहलीने चहलच्या हाती चेंडूं सुपूर्द केली. चहल सातवे षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. यावेळी चहल गोलंदाजीचा सराव करत होता. त्यावेळी लोकेश राहुल हा स्ट्राइकवर होता, तर गेल हा नाइट स्ट्राइकवर होता. त्यावेळी चहलने खेळपट्टीकडे पाहिले आणि हाताला माती लावली. त्यावेळी गेल आणि चहलमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. पण ती धक्काबुक्की नव्हती. तर गेलने गमतीने चहलला ढकलल्याचे त्यानंतर निष्पन्न झाले.

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीएबी डिव्हिलियर्सकिंग्ज इलेव्हन पंजाबआयपीएल 2019