चेन्नई, आयपीएल २०१९ : यंदाच्या आयपीएलची सुरुवात होणार आहे ती चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघांमधील सामन्याने. बंगळुरुविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी चेन्नईचे हे अकरा शिलेदार मैदानात उतरू शकतात.
1. महेंद्रसिंग धोनी : चेन्नईचे कर्णधारपद आतापर्यंत महेंद्रसिंग धोनीकडेच आहे. कॅप्टन कूल धोनी या हंगामात नेमके कसे नेतृत्व करतो, याकडे सर्वांची नजर असेल.
2. सुरेश रैना : भारतीय संघात सुरेश रैनाला स्थान टिकवता आले नसले तरी तो ट्वेन्टी-२० क्रिकेटमधला नामांकित फलंदाज आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्याला नक्कीच संधी देण्यात येईल.
3. शेन वॉटसन : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन हा एकहाती सामना फिरवू शकतो.
4.अंबाती रायुडू : चेन्नईच्या संघात आल्यावर रायुडूच्या फलंदाजीमध्ये सकारात्मक बदल झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळेल, अशी अपेक्षा आहे.
5. केदार जाधव : एक अष्टपैलू खेळाडू म्हणून केदारने भारतीय संघात आपले स्थान बळकट केले आहे. चेन्नईच्या संघातून या हंगामातील बरेच सामने केदार खेळेल, अशी आशा आहे.
6. ड्वेन ब्राव्हो : वेस्ट इंडिजचा अव्वल अष्टपैलू खेळाडू असलेला ड्वेन बऱ्याच वर्षांपासून चेन्नईच्या संघात आहे. त्यामुळे या हंगामातही त्याच्यावर चेन्नईची भिस्त असेल.
7. रवींद्र जडेजा : धोनीचा खास पठ्या म्हणून जडेजाकडे पाहिले जाते. पण जडेजानेही आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे.
8. शार्दुल ठाकूर : भारताता युवा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर धोनीच्या तालमीत चांगलाच तयार झाला आहे.
9. इम्रान ताहिर : ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ताहिरने आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे चेन्नईच्या पहिल्या सामन्यासाठी त्याला संधी देण्यात येईल.
10. दीपक चहार : गेल्यावर्षी चेन्नईकडून खेळताना दीपकने भेदक गोलंदाजी केली होती. त्यामुळे यावर्षीही त्याला चेन्नईचा संघ जास्त संधी देण्याची शक्यता आहे.
11. डेव्हिड विली : लुंगी एंगीडी आयपीएलमधून बाहेर पडल्यामुळे पहिल्या सामन्यात चेन्नईकडून डेव्हिड विलीला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विली हा वेगवान गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी करतो.