Join us  

IPL 2019 : लोकसभा निवडणुकींच्या तारखेनंतर आयपीएलचे वेळापत्रक ठरणार

देशात लोकसभा निवडणूकांची धुम सुरु आहे. पण यावेळीच देशात इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 12:13 PM

Open in App
ठळक मुद्देआयपीएलच्या 12व्या हंगामाचा मुहूर्त ठरता ठरेना23 मार्चपासून स्पर्धेला सुरुवात, पण वेळापत्रकाचा पत्ता नाही

मुंबई : देशात लोकसभा निवडणूकांची धुम सुरु आहे. पण यावेळीच देशात इंडियन प्रीमिअर लीगही (आयपीएल) रंगणार आहे.  हे दोन्ही महासोहळे एकाचवेळी जर भारतात झाले तर सुरक्षायंत्रणेवर अतिरीक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे सर्वांचा नजरा आयपीएलच्या वेळापत्रकावर लागलेल्या आहेत. 4 फेब्रुवारीला आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा होणे अपेक्षित होते, परंतु आता नव्या माहितीनुसार लोकसभा निडवणुकीच्या तारखा ठरल्यानंतरच आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आहे. 

मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. 23 मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) केली होती. आयपीएलच्यावेळी भारतामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामना भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती. पण बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील, असे मत व्यक्त केले होते. पण, त्यावेळी त्यांनी वेळापत्रक जाहीर केले नव्हते. 

सध्याच्या सरकारचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे आणि त्यानंतर निवडणूक होतील. 30 मे ते 14 जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे. 2009 मध्ये निवडणुकांमुळे संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती, तर 2014 मध्ये स्पर्धेचा काही टप्पा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात आला होता. 

पण, यंदा आयपीएल, लोकसभा निवडणूक व वर्ल्ड कप हे एकाच वर्षी आल्या आहेत. हिंदुस्थान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. '' आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागेल. निवडणूक आयोगाने लोकसभेच्या तारखा जाहीर केल्यानंतर आम्ही वेळापत्रक जाहीर करू. त्यानंतरच नियोजन करण्यात येईल,'' असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. 

आयपीएलमधील 10 महागडे खेळाडू, तुम्हाला माहित आहेत का?इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी जयपूर येथे झाला. 70 जागांसाठी 346 हून अधिक खेळाडू रिंगणात होते. त्यात सर्वाधिक भाव खाल्ला तो वरुण चक्रवर्ती, जयदेव उनाडकट यांनी. पण आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागड्या खेळाडूचा मान अजूनही युवराज सिंगच्या नावावर आहे. 2015 मध्ये त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्स ( सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) संघाने 16 कोटींत घेतले होते. 

आयपीएलमधील दहा महागडे खेळाडूयुवराज सिंग - दिल्ली डेअरडेव्हिल्स 16 कोटी ( 2015)बेन स्टोक्स - पुणे सनरायजर्स 14.5 कोटी ( 2017)युवराज सिंग - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14 कोटी ( 2014)बेन स्टोक्स - राजस्थान रॉयल्स 12.5 कोटी ( 2018)दिनेश कार्तिक - दिल्ली डेअरडेव्हिल्स 12.5 कोटी ( 2014)जयदेव उनाडकट - राजस्थान रॉयल्स 11.5 कोटी ( 2018)गौतम गंभीर - कोलकाता नाईट रायडर्स 11.4 कोटी ( 2011)लोकेश राहुल - किंग्ज इलेव्हन पंजाब 11 कोटी ( 2018)दिनेश कार्तिक - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 10.5 कोटी ( 2015)रवींद्र जडेजा - चेन्नई सुपर किंग्ज 9.72 कोटी ( 2012)

टॅग्स :आयपीएलआयपीएल 2019इंडियन प्रीमिअर लीगबीसीसीआय