चेन्नई, आयपीएल 2019: क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. काही वेळा एखादा थ्रो स्टम्पला लागला की बेल्स पडत नाही, असे काही वेळा पाहायला मिळाले. पण राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यात त वेगवान गोलंदाचा चेंडू स्टम्पला लागूनही फलंदाज नॉटआऊट झाल्याचे पाहायला मिळाले.
ही गोष्ट घडली ती धवल कुलकर्णीच्या चौथ्या षटकात. चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले. धवलचा एक चेंडू ख्रिस लिन फलंदाजी करत असताना स्टमपला लागला. यावेळी स्टम्पची लाईट पेटली, पण बेल्स पडली नाही, त्यामुळे लिनला आऊट देण्यात आले नाही. या साऱ्या प्रकारानंतर सर्वांनाच धक्का बसला. राजस्थानच्या खेळाडूंनी पंचांकडे धाव घेतली. पण लिन हा नॉटआऊट असल्याचेच त्यांनी सांगितले.
पाहा खास व्हिडीओ
पाहा धोनी इफेक्ट, जेव्हा बेल्सलाही वाटते 'माही'ने खेळावे
जस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईची सुरुवात चांगली झाली नव्हती. चेन्नईने आपले पहिले तिन्ही फलंदाज २७ धावांमध्ये गमावले होते. त्यानंतर धोनी खेळायला आला. धोनीला बाद करण्याचे राजस्थानने बरेच प्रयत्न केले. पण स्टम्पच्या बेल्सला ते मान्य नसल्याचे पाहायला मिळाले.
हा प्रकार घडला तो पाचव्या षटकात. पाचवे षटक जेफ्रो आर्चर टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूचा सामना धोनी करत होता. धोनीचा हा सामन्यातील दुसराच चेंडू होता आणि त्याने अजून आपले खातेही उघडले नव्हते. त्यावेळी हा पाचव्या षटकातील चौथा चेंडू यष्ट्यांना लागला होता. पण धोनी आऊट मात्र झाला नाही. कारण त्यावेळी स्टम्पवरील बेल्स पडली नाही आणि धोनी नाबाद राहिला.
Web Title: IPL 2019: Good luck ... the ball hit the stumps, but still the batsman was not out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.