मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर इंडियन प्रीमिअर लीगमधील ( आयपीएल) सहभागी संघांना घरच्या मैदानावर खेळता येणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, लोकसभा निवडणूक आणि आयपीएलचे सामने ही तारेवरची कसरत पार करण्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) यश आले आहे. त्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या साखळी फेरीच्या वेळापत्रकानुसार प्रत्येक संघ घरच्या मैदानावर किमात सात सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्सचेही सामने वानखेडे स्टेडियमवरच होणार असल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे.
मुंबईबाहेरील सामने28 मार्च : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू30 मार्च : किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स, मोहाली6 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद18 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली20 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, जयपूर 26 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई28 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता