मुंबई, आयपीएल 2019 : कर्णधार फक्त मैदानातच रणनीती आखतो, असे नाही, तर स्पर्धा सुरु होण्यापूर्वीही त्याला प्लॅनिंग करावे लागते. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही असेच प्लॅनिंग करतो. तो नेमका कसं प्लॅनिंग करतो, याचा एक व्हिडीओ मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.हा पाहा खास व्हिडीओ
'हिटमॅन' रोहित बनला 'गली बॉय'रणवीर सिंगचा गली बॉय हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्या चित्रपटातील गाणी तर भलतीच हिट झाली आहेत. त्यात रणवीर सिंगने साकारलेले कॅरेक्टर हे लोकांना फारच भावले. रणवीरच्या या गली बॉयच्या चाहत्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही सहभागी झाला आहे आणि त्यानं चक्क मुली समायरासाठी रॅप साँग गायले. सोशल मीडियावर रोहितचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
भारतीय संघातील हिटमॅन रोहित शर्मा आणि रितिका सजदेह या दाम्पत्याला डिसेंबर महिन्यात कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यांनी तिचं नाव समायरा असं ठेवलं . काही दिवसांपूर्वई या शर्मा दाम्पत्याची मान अभिमानानं उचावली आणि त्याला कारण त्यांची तीन महिन्यांची समायरा ठरली आहे. ओल पेजेटा या वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेनं समायराचा गौरव केला आहे. केनियातील वन्यजीव संरक्षित क्षेत्रात जन्मलेल्या मादी गेंड्याला समायराचे नाव देण्यात आले आहे. दोन महिनेच्या कन्येचा झालेला हा गौरव पाहून बापमाणूस रोहितचे डोळे पाणावले आणि त्याने ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
रोहित शर्माच्या कन्येला मुंबई इंडियन्सकडून खास गिफ्टमुंबई इंडियन्स यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगमधील पहिला सामना आज खेळणार आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सचा सामना करणार आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्माच्या कन्येला खास गिफ्ट दिले आहे. मुंबई इंडियन्सने समायराला दिलेले हे गिफ्ट पाहून रोहितही भारावला.
भारतीय संघातील हिटमॅन रोहित शर्मा आणि रितिका सजदेह या दाम्पत्याला डिसेंबर महिन्यात कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यांनी तिचं नाव समायरा असं ठेवलं . काही दिवसांपूर्वई या शर्मा दाम्पत्याची मान अभिमानानं उचावली आणि त्याला कारण त्यांची तीन महिन्यांची समायरा ठरली आहे. ओल पेजेटा या वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेनं समायराचा गौरव केला आहे. केनियातील वन्यजीव संरक्षित क्षेत्रात जन्मलेल्या मादी गेंड्याला समायराचे नाव देण्यात आले आहे. दोन महिनेच्या कन्येचा झालेला हा गौरव पाहून बापमाणूस रोहितचे डोळे पाणावले आणि त्याने ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
ग्रेट भेट! सचिन आणि गांगुली मैदानात उतरतात तेव्हा...एक काळ असा होता की, भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुली एकत्र सलामीसाठी मैदानात उतरायचे. सचिन-गांगुली या जोडीने भारताला बऱ्याचदा चांगली सुरुवात करून दिली होती. एकेकाळी या दोघांचे क्रिकेट विश्वावर राज्य होते. पण हे दोघे निवृत्त झाल्यानंतर मात्र त्यांची भेट मैदानात झाल्याचे दिसले नाही. पण आज मात्र सचिन आणि गांगुली यांची वानखेडे स्टेडियममध्ये भेट झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई इंडियन्सचा आज पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स संघाबरोबर होणार आहे. सचिन हा मुंबईकडून खेळत नसला तरी तो संघाचा आधारस्तंभ आहे. गांगुलीदेखील दिल्लीच्या संघाचा सल्लागार आहे. त्यामुळे सामना सुरु होण्यापूर्वी सचिन आणि गांगुली यांची भेट झाल्याचे पाहायला मिळाले. सचिन आणि गांगुली हात मिळवत असताना महेला जयवर्धनेच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्यकारक भाव होते.