मुंबई, आयपीएल २०१९ : भेदक गोलंदाजी आणि दमदार सलामीच्या जोरावर सनरायझर्स हैदाराबादने दिल्ली कॅपिटल्सववर विजय मिळवला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना १२९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.
सनरायझर्स हैदाराबादच्या गोलंदाजांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात भेदक मारा केला आणि त्यांच्या धावसंख्येला वेसण घातले. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. दिल्ली प्रथम फलंदाजी करताना १२९ धावा करता आल्या.
हैदराबादने नाणेफेक जिंकत दिल्लीला फलंदाजीसाठी पाचारण केले. पण दिल्लीचे सलामीवीर झटपट बाद झाले. त्यानंतर अय्यरला दुसऱ्या फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळेच दिल्लीला मोठी धावसंख्या रचता आली नाही. अय्यरने ४१ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या.