हैदराबाद, आयपीएल २०१९ : यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे ते चेन्नई सुपर किंग्सच्या इम्रान ताहिरने. विकेट मिळवल्यावर ताहिर ज्यापद्धतीने सेलिब्रशेन करतो, ते पाहायला चाहत्यांना चांगलेच आवडते. आजच्या सामन्यात चाहते ताहिरच्या सेलिब्रेशनची वाट पाहत होते आणि त्यांना ही गोष्ट पाहायलाही मिळाली ताहिरने सूर्यकुमार यादवला क्लीन बोल्ड केले आणि त्यानंतर त्याने आपल्या खास स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले.
फायनलमध्ये धोनीच्या नावावर झाला 'हा' विक्रम
आयपीएलच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली आहे. मुंबईने धडाकेबाज सुरुवात केली असली तरी रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर त्यांची धावगती थोडीशी मंदावली. पण या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर एक विक्रम झाला आहे.
या सामन्यात तुफानी सुरुवात केली ती डीकॉकने. पण शार्दुल ठाकूरने त्याला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. त्यानंतर दीपक चहरने रोहित शर्माला धोनीवकरवी झेलबाद केले आणि मुंबईला मोठा धक्का दिला. या विकेटसह धोनीने आपल्या नावावर एक विक्रम झाला आहे. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये स्टम्पमागे सर्वाधिक झेल आणि यष्टीचीत करणारा धोनी सर्वोत्तम यष्टीरक्षक ठरला आहे. धोनीने रोहितचा झेल पकडत आयपीएलमध्ये १३२ फलंदाजांना बाद केले आहे. धोनीने यावेळी दिनेश कार्तिकला पिछाडीवर टाकले आहे.
Web Title: IPL 2019: Imran Tahir's Fine Celebration in the Final, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.