Join us  

IPL 2019 : आयपीएलचे सर्व सामने दुबईऐवजी भारतात होणार

भारतामध्ये निवडणूकांच्यावेळी आयपीएल आहे. त्यामुळे 2019 साली आयपीएलचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवले जातील, असे म्हटले जात होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 2:20 PM

Open in App

जयपूर : पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांच्यावेळी भारतामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आयपीएलचे सामना भारतात होणार की नाही याबाबत साशंकता होती. पण बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आयपीएलचे सर्व सामने भारतातच होतील, असे मत व्यक्त केले आहे.

भारतामध्ये निवडणूकांच्यावेळी आयपीएल आहे. त्यामुळे 2019 साली आयपीएलचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवले जातील, असे म्हटले जात होते. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा संयुक्त अरब अमिरातीमध्ये मोठ्या संख्येने सामने होत आहेत. पाकिस्तानचे तर हे घरचे मैदान आहे. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी आशिया चषकही संयुक्त अरब अमिरातीमध्ये झाला होता. टी-10 ही लीगही दुबईमध्ये खेळवली गेली होती. त्यामुळे आगामी आयपीएल संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली जाईल, अशी चर्चा होती. पण चौधरी यांच्या वक्तव्याने या चर्चेली पूर्णविराम मिळाला आहे.

याबाबत चौधरी म्हणाले की, " आयपीएलचा एकही सामना भारताबाहेर खेळवण्यात येणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत." 

आयपीएलमधील 10 महागडे खेळाडू, तुम्हाला माहित आहेत का?इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी जयपूर येथे झाला. 70 जागांसाठी 346 हून अधिक खेळाडू रिंगणात होते. त्यात सर्वाधिक भाव खाल्ला तो वरुण चक्रवर्ती, जयदेव उनाडकट यांनी. पण आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागड्या खेळाडूचा मान अजूनही युवराज सिंगच्या नावावर आहे. 2015 मध्ये त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्स ( सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) संघाने 16 कोटींत घेतले होते. 

आयपीएलमधील दहा महागडे खेळाडूयुवराज सिंग - दिल्ली डेअरडेव्हिल्स 16 कोटी ( 2015)बेन स्टोक्स - पुणे सनरायजर्स 14.5 कोटी ( 2017)युवराज सिंग - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 14 कोटी ( 2014)बेन स्टोक्स - राजस्थान रॉयल्स 12.5 कोटी ( 2018)दिनेश कार्तिक - दिल्ली डेअरडेव्हिल्स 12.5 कोटी ( 2014)जयदेव उनाडकट - राजस्थान रॉयल्स 11.5 कोटी ( 2018)गौतम गंभीर - कोलकाता नाईट रायडर्स 11.4 कोटी ( 2011)लोकेश राहुल - किंग्ज इलेव्हन पंजाब 11 कोटी ( 2018)दिनेश कार्तिक - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 10.5 कोटी ( 2015)रवींद्र जडेजा - चेन्नई सुपर किंग्ज 9.72 कोटी ( 2012)

टॅग्स :आयपीएलभारतबीसीसीआय