आयपीएल 2019 : आयपीएलचा ज्वर चांगलाच चढला आहे. आता कोणता संघ आयपीएल जिंकू शकतो, यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. आयपीएलची फायनल नेमकी कुठे होणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. चेन्नईचा संघ गतविजेता असल्यामुळे या हंगामाचा अंतिम फेरीचा सामना येथील चेपॉक स्टेडियमवर होईल, असे वाटत होते. पण आता आयपीएलची फायनल चेन्नईकडून हिरावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आयपीएलच्या प्रशासकिय समितीची एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये जर चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना होऊ शकणार नसेल तर ही लढत हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होऊ शकते. बीसीसीआयने अप्रत्यक्षपणे चेन्नईला संकेत दिल्याचे म्हटले जात आहे.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममधील तीन स्टँड हे रिकामी असल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये या स्टँडमध्ये एकही व्यक्ती पाहायला मिळालेला नाही. 2012 सालापासून या तीन स्टँडला परवानगी येथील स्थानिक पालिकेने दिलेली नाही. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून चेपॉक स्टेडियममधील तीन स्टँडमध्ये कुणीही पाहायला मिळालेले नाही. ही गोष्ट आयपीएलसाठी नुकसान करणारी आहे. त्यामुळेच आयपीएलच्या प्रशासकिय समितीने चेन्नईमध्ये सामना झाला नाही तर हैदराबादचा पर्याय खुला ठेवला आहे.
याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, " चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील तीन स्टँड हे सध्या रिकामी आहेत. तिथे एकही व्यक्ती पाहायला मिळालेली नाही. ही आमच्यासाठी फार मोठी बाब आहे. जर असेल असेल तर या ठिकाणी अंतिम सामना कसा ठेवायचा, हादेखील मोठा प्रश्न आहे. बंगळुरु आणि हैदराबाद येथे आम्ही प्ले-ऑफचे सामने ठेवले आहेत. आता या पर्यायांचा आम्ही विचार केला आहे."
लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. त्यानुसार सुरक्षे यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेता बीसीसीआयने आयपीएल वेळापत्रक जाहीर करण्यासाठी वेळ घेतला. आयपीएलमधील सर्व संघ मालक आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणेशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी अखेरीस त्यांनी वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे प्रत्येक राज्यातील निवडणुकीपूर्वीच लीग सामने संपवण्यात येणार आहेत. अंतिम सामन्याचे ठिकाण ठरवण्यात येणार आहे आणि त्यासाठी चेन्नईचे नाव आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते.
Web Title: IPL 2019: IPL's final chances of Chennai will be less
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.