Join us  

IPL 2019 : अति घाई, संकटात नेई; बेअरस्टोनं केला 'धोनी' स्टाईल रन आउट

IPL 2019 : कोलकाता नाइट रायडर्सला दमदार सुरुवातीनंतर चार फलंदाज झटपट गमवावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 4:57 PM

Open in App

हैदराबाद, आयपीएल 2019 : कोलकाता नाइट रायडर्सला दमदार सुरुवातीनंतर चार फलंदाज झटपट गमवावे लागले. तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक समजदारीने खेळ करेल अशी अपेक्षा होती. परंतु अति घाई त्याला नडली. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात त्याला धावबाद होऊन माघारी परतावे लागले. सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने त्याला धावबाद केले. बेअरस्टोने अगदी 'धोनी' स्टाईलने रन आउट केला. 

ख्रिस लीन आणि सुनील नरीन यांनी हैदराबादने दिलेले प्रथम फलंदाजीचे आव्हान स्वीकारत दमदार सुरुवात केली. या दोघांनी 2.3 षटकांत 42 धावा चोपल्या. हैदराबादच्या खलील अहमदच्या तिसऱ्या षटकात नरीनने 6,4,4 अशी फटकेबाजी केली, परंतु खलीलने चौथ्या चेंडूवर नरीनचा दांडा उडवला. नरीन 8 चेंडूंत 25 धावा ( 3 चौकार व 2 षटकार) करून माघारी परतला. 

पाचव्या षटकात खलीलने कोलकाताला आणखी एक धक्का दिला. त्याने शुबमन गिलला झेलबाद केले. कोलकाताला 50 धावांवर दोन झटके बसले. कोलाकाताने पॉवर प्लेमध्ये 2 बाद 62 धावा केल्या. हैदराबादविरुद्धची ही कोणत्याही संघाने यंदाच्या हंगामात पॉवर प्लेमध्ये केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. लीन आणि नितीश राणा ही जोडी कोलकाताला तारेल असे वाटत असताना भुवनेश्वर कुमारने धक्का दिला. त्याने राणाला (11) यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. कर्णधार दिनेश कार्तिकही 5 धावांची भर घालून धावबाद झाला. एक अतिरिक्त धाव घेण्याच्या प्रयत्नात कार्तिक आपली विकेट गमावून बसला. 

पाहा व्हिडीओ...https://www.iplt20.com/video/175890 

टॅग्स :आयपीएल 2019कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबाददिनेश कार्तिक