ठळक मुद्देमुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी युवराज सिंग उत्सुकआयपीएलच्या वेळापत्रकानुसार मुंबईचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स संघाशी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना
मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL) 12 व्या हंगामाच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आलं. 23 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स ( आधीचे दिल्ली डेअरडेव्हिल्स) यांच्याशी होणार आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या युवराज सिंगच्या कामगिरीच्या सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी युवीही तितकाच उत्सुक आहे. पण, कर्णधार रोहित शर्माने त्याच्याकडून संघाला काय अपेक्षा आहेत, हे ट्विट केलं आहे.
धडाकेबाज फलंदाज युवीच्या भारतीय संघात पुनरागमनाच्या आशा मावळल्या असल्या तरी आयपीएलमध्ये त्याला आपलं नाणं खणखणीत वाजवण्याची संधी आहे. 2019च्या आयपीएल हंगामात तो मुंबईकडून खेळणार आहे. मुंबई संघाने अगदी शेवटच्या क्षणाला युवराजला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. तीन वेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने युवराजला 1 कोटीच्या मुळ किमतीत चमूत दाखल करून घेतले आहे. 2018मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला दोन कोटीच्या मुळ किमतीत घेतले होते. परंतु त्याला आठ सामन्यांत केवळ 65 धावा करता आल्या आणि पंजाबने त्याला करारमुक्त केले.
मंगळवारी 17 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आणि त्यात मुंबई इंडियन्सच्या वाट्याला चार सामने आले आहेत. आठही संघांना घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे. दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर बंगळुरु यांच्या वाट्याला प्रत्येकी पाच सामने आले आहेत. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर दोन आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर दोन सामने खेळतील. या घोषणेनंतर बुधवारी युवराजने एक ट्विट केलं. तो म्हणाला,'' मुंबई इंडियन्स आणि हिटमॅन रोहित शर्मा यांच्यासोबत खेळण्यासाठी उत्सुक आहे. त्यांना काय अपेक्षा आहे, कोणी सांगेल का?''
युवीच्या या ट्विटवर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने लगेच उत्तर दिले. तो म्हणाला, ''क्रिकेटमधील तुझी जी पॅशन आहे ती घेऊन ये. बाकी सर्व आम्ही पाहून घेऊ.''
मुंबई इंडियन्सचे सामने कधी व कोणाशी? 24 मार्च मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स मुंबई
28 मार्च रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स बंगळुरू
30 मार्च किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स मोहाली
3 एप्रिल मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज मुंबई
Web Title: IPL 2019 : Just bring your usual passion, rohit sharma advice yuvraj singh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.