बंगळुरू, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या मोसमाला सुरुवात होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत, परंतु त्याचा ज्वर चांगलाच चढलेला पाहायला मिळत आहे. तीन दिवसांत आयपीएलमध्ये उत्कृष्ट फटकेबाजी पाहायला मिळाल्या. रिषभ पंत, आंद्रे रसेल यांची मॅच व्हिनींग आतषबाजी, तर आर. अश्विनचा मांकड रनआऊट याचीच चर्चा आहे. मैदानावरील या घडामोडी क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करत आहेतच, परंतु पडद्यामागेही अशा अनेक गोष्टी घडत आहेत.
इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हीन पीटरसन आणि भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांच्यातही अशीच एक घटना घडली. आयपीएलमध्ये दोघंही समालोचकाच्या भूमिकेत आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात फिरोज शाह कोटलावर झालेल्या सामन्यातील या घटनेवरून पीटरसननं गावस्करांना ट्रोल केले. आयपीएलचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीसाठी सामन्याचे वार्तांकन करताना पीटरसनच्या उंचीबरोबर येण्यासाठी गावस्करांना बॉक्सवर उभं करण्यात आले होते. त्यावरून पीटरसनने लिटल मास्टरना ट्रोल केले.
ड्वेन ब्राव्होन 33 धावा देत दिल्लीचे 3 फलंदाज बाद केले. त्यामुळे दिल्लीला निर्धारीत 20 षटकांत 6 बाद 147 धावाच करता आल्या. मुंबई इंडियन्सविरुद्ध वादळी खेळी खेळणाऱ्या रिषभ पंतला ( 25) ब्राव्होने बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना शेन वॉटसन ( 44) आणि सुरेश रैना ( 30) यांनी चेन्नईचा डाव सावरला. केदार जाधव ( 27) आणि धोनी ( 32) यांनीही दमदार खेळी करत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईचा हा सलग दुसरा विजय ठरला.