मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सने गुरुवारी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून प्ले ऑफमध्ये स्थान पक्के केले. सुपर ओव्हरमध्ये 9 धावांचे लक्ष्य मुंबईने तीन चेंडूतच पार केले. मुंबई इंडियन्सच्या क्षेत्ररक्षणात सर्वात चपळ खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड ओळखला जातो. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याची प्रचिती आली. पण, यावेळी चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात पोलार्डल सीमारेषेबाहेर अडखळून पडला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
31 वर्षीय पोलार्डने हैदराबादचे आव्हान स्वीकारले, परंतु यावेळी क्षेत्ररक्षण करताना चेंडूने बाजी मारली. चेंडूचा वेग इतका होता की पोलार्डला तो पायानेही अडवता आला नाही. उलट तोच सीमारेषेबाहेर गेला आणि तोल गमावत त्याला जाहीरातीच्या बोर्डावरून पडावे लागले.
पाहा व्हिडीओ...
तुझ्यासमोर गोलंदाजी करावी तर कशी?, बुमराहच्या प्रश्नावर हार्दिकचं उत्तर, पाहा व्हिडीओ डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांची उणीव सनरायझर्स हैदराबादला गुरुवारच्या सामन्यात प्रकर्षाने जाणवली असावी. मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना हैदराबादने निर्धारित षटकांत बरोबरीत राखला खरा,परंतु सुपर ओव्हरमध्ये त्यांना हार पत्करावी लागली. विजयासाठी एका षटकात 9 धावांचे आवश्यक लक्ष्य मुंबईने तीन चेंडूत पार केले. हार्दिक पांड्याने पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला आणि मुंबईचा विजय पक्का केला. हार्दिकने यंदाच्या आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळी केली आहे आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना त्याला चेंडू नक्की कोठे टाकावा हा प्रश्न पडला आहे. सहकारी जसप्रीत बुमराहने या प्रश्नाचे उत्तर मिळवले.
Web Title: IPL 2019: Kieron Pollard funnily runs over the advertisement board during a fielding attempt in MI vs SRH match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.