मोहाली, आयपीएल 2019 : मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज आयपीएलचा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने मागच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केले, तर पंजाबला कोलकाता नाइट रायडर्सकडून हार मानावी लागली. कोलाकाताविरुद्ध क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचा फटका पंजाबला बसला. त्यामुळे या चुका सुधारून घरच्या मैदानावर मुंबईवर विजय मिळवण्यासाठी ते सज्ज आहेत. या सामन्याच्या निमित्ताने पंजाबचा लोकल बॉय युवराज सिंग विरुद्ध लोकल संघ किंग्स इलेव्हन पंजाब हा सामना पाहायला मिळणार आहे.
रोहित शर्मा : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हा कोणत्याही गोलंदाजांची लय बिघडवण्याची धमक राखतो. त्याने या हंगामात 33 चेंडूंत 48 धावांची फटकेबाजी केली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
रवीचंद्रन अश्विन : कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात झालेल्या चुका सुधारण्याची आर अश्विनला संधी आहे. त्याशिवाय त्याला आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.
लोकेश राहुल : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीनं लोकेश राहुलला आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण खेळ करावाच लागणार आहे. त्याला पहिल्या दोन सामन्यांत केवळ 5 धावा करता आल्या आहेत.
युवराज सिंग : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाल्यापासून युवराज सिंगची बॅट चांगलीच तळपली आहे. पहिल्याच सामन्यात अर्धशतक आणि RCB विरुद्धही जोरदार फटकेबाजी, यामुळे युवीकडून अपेक्षा उंचावत चालल्या आहेत.
संभाव्य 11 शिलेदारमुंबई इंडियन्स : क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, किरॉन पोलार्ड, बेन कटिंग, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह, मयांक मार्कंडे
किंग्स इलेव्हन पंजाब : ख्रिस गेल, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, सर्फराज खान, मनदीप सिंग, डेव्हिड मिलर, रविचंद्रन अश्विन, मुजीब उर रहमान, अंकित रजपूत, मोहम्मद शमी, अँड्रू टाय.
सामन्याची वेळः सायंकाळी 4 वाजल्यापासून
थेट प्रक्षेपणः स्टार स्पोर्ट्स वाहिनी, हॉट स्टार