IPL 2019 : KKRच्या आंद्रे रसेलनं हॉटेलचे नियम मोडले, केलं असं काही

IPL 2019: कोलकाता नाइट रायडर्सने घरच्या प्रेक्षकांसमोर विजय खेचून आणला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 12:06 PM2019-03-26T12:06:16+5:302019-03-26T12:06:40+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: KKR Andre Russell broke the rules of the hotel, bowling practice in Hotel lobby | IPL 2019 : KKRच्या आंद्रे रसेलनं हॉटेलचे नियम मोडले, केलं असं काही

IPL 2019 : KKRच्या आंद्रे रसेलनं हॉटेलचे नियम मोडले, केलं असं काही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने घरच्या प्रेक्षकांसमोर विजय खेचून आणला. 19 चेंडूंत नाबाद 49 धावांची खेळी करणारा आंद्रे रसेल KKRच्या विजयाचा नायक ठरला. त्याच्या फटकेबाजीमुळे सनरायझर्स हैदराबादला पराभव पत्करावा लागला आणि डेव्हीड वॉर्नरच्या झोकात पुनरागमनावर पाणी फिरवले गेले. सामन्यानंतर रसेलनं गतीमंद चाहत्याची भेट घेऊन सर्वांची मनं जिंकली. पण, त्याच रसेलनं मंगळवारी नियमांचे उल्लंघन केले. 



 

अनुभवी फलंदाज अपयशी ठरल्यानंतर नितीश राणा (68) आणि रसेल यांनी केलेल्या दमदार फटकेबाजीनं कोलकाताला विजय मिळवून दिला. हैदराबादने विजयासाठी ठेवलेले 182 धावांचे लक्ष्य कोलकाताने 6 विकेट्स राखून पार केले. एका वर्षांनंतर आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या वॉर्नरच्या ( 85) फटकेबाजीनं हा सामना गाजवला. डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो आणि विजय शंकरच्या फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादने 3 बाद 181 धावा चोपल्या. 



लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताचा ख्रिस लीन दुसऱ्याच षटकात माघारी फिरला. त्यानंतर उथप्पा आणि नितीश राणा यांनी कोलकाताचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, सिद्धार्थ कौलने 27 चेंडूंत 35 धावा करणाऱ्या उथप्पाला त्रिफळाचीत केले. पण, राणाने एका बाजूने फटकेबाजी करताना कोलकाताच्या विजयाच्या आशा जीवंत राखल्या. 16व्या षटकांत राणा बाद झाला. त्याने 47 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह 68 धावा केल्या. रशीद खानने त्याला पायचीत केले. रसेलनं 19 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 49 धावा केल्या.



कोलकाताचा दुसरा सामना  किंग्स इलेव्हन पंजाबशी होणार आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या सामन्यासाठी कोलकाताचा संघ सज्ज आहे आणि रसेल पुन्हा चौकार-षटकाराची आतषबाजी करण्यासाठी आतुर आहे. त्यासाठी तो चक्क राहत असलेल्या हॉटेलचे नियम मोडून सराव करत आहे. रसेलन मंगळवारी हॉटेलच्या लॉबीतच गोलंदाजीचा सराव केला आणि कोलकाता संघाने तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ..


Web Title: IPL 2019: KKR Andre Russell broke the rules of the hotel, bowling practice in Hotel lobby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.