कोलकाता, आयपीएल 2019 : कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज इडन गार्डनवर आयपीएल सामना रंगणार आहे. कोलकाताने सहा सामन्यात 4 विजय मिळवते आहेत, तर दिल्लीलला 3 विजय मिळवता आले आहेत. मात्र, दिल्लीने घरच्या मैदानावर कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी कोलकाता सज्ज झाला आहे.
कोलकाताची संपूर्ण मदार ही आंद्रे रसेलवर आहे. त्याला अन्य फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळत नाही. ख्रिस लीन, सुनील नरीन, रॉबीन उथप्पा आणि नितीश राणा यांना सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. शुबमन गिलला सहाव्या स्थानावर खेळवण्याचा निर्णय चुकीचा ठरत आहे. त्यामुळे त्याला बढती दिली जाऊ शकते. पियुष चावला, कुलपीद यादव आणि नरीन यांच्यावर गोलंदाजीची भिस्त आहे.
दुसरीकडे दिल्लीचा संघही विजयपथावर परतला आहे. दिल्लीची संपूर्ण मदार ही त्यांच्या गोलंदाजांवर आहे. कागिसो रबाडा, अक्षर पटेल आणि संदीप लामिचाने हे त्यांचे प्रमुख अस्त्र आहेत. फलंदाजीत शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी निराश केले आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि कॉलिन इंग्राम यांनी योगदान दिले आहे.
- 07- कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमधील मागील दहा सामन्यांपैकी सातमध्ये दिल्लीला पराभूत केले आहे.
- 21- पियुष चावलाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 21 विकेट्स घेतल्या आहेत.
- 50 - आंद्रे रसेलला आयपीएलमध्ये 50 विकेट पूर्ण करण्यासाठी 1 गडी बाद करावा लागणार आहे. आज त्याने दोन विकेट घेतल्यास कोलकाताकडून 50 विकेट घेणारा तो पहिलाच जलदगती गोलंदाज ठरणार आहे.
- 150 - अमित मिश्राला 150 विकेटचा टप्पा गाठण्यासाठी एक खेळाडू बाद करावा लागणार आहे. लसिथ मलिंगानंतर 150 विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरणार आहे.
- 150- शिखर धवनचा हा 150वा सामना आहे, आयपीएलमध्ये हा पल्ला गाठणारा तो 12 वा खेळाडू ठरणार आहे.