12 Apr, 19 11:40 PM
शिखर धवनचे शतक हुकले; इनग्रामचा विजयी षटकार
शिखर धवनचे शतक तीन धावांनी हुकले; इनग्रामने विजयी षटकार खेचत दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला.
12 Apr, 19 11:36 PM
इनग्रमचा चौकार; दिल्लीला 9 चेंडूंत 6 धावांची गरज
इनग्रमचा चौकार; दिल्लीला 9 चेंडूंत 6 धावांची गरज
12 Apr, 19 11:35 PM
दिल्लीला 11 चेंडूंत 11 धावांची गरज
दिल्लीला 11 चेंडूंत 11 धावांची गरज; धवन शतकापासून 4 धावांवर दूर
12 Apr, 19 11:31 PM
दिल्ली कॅपिटल्सला 16 चेंडूंत 16 धावांची गरज
इनग्रम आणि शिखर धवन क्रिझवर; धवन शतकापासून 6 धावा दूर
12 Apr, 19 11:30 PM
रिषभ पंत षटकार खेचण्याच्या नादात झेलबाद
12 Apr, 19 11:25 PM
रिषभ पंतची फटकेबाजी
12 Apr, 19 11:24 PM
दिल्लीला 24 चेंडूंत 31 धावांची गरज
दिल्लीला 24 चेंडूंत 31 धावांची गरज; शिखर धवन शतकाच्या उंबरठ्यावर
12 Apr, 19 11:18 PM
दिल्ली कॅपिटल्सला 30 चेंडूंत 41 धावांची गरज.
दिल्ली कॅपिटल्सला 30 चेंडूंत 41 धावांची गरज. शिखर धवन 50 चेंडूंत 84 धावांवर आणि रिषभ पंत 24 चेंडूंत 31 धावांवर क्रिझवर
12 Apr, 19 11:06 PM
रिषभ पंतने ठोकला चौकार; दिल्ली कॅपिटल्सला 39 चेंडूंत 55 धावांची गरज
12 Apr, 19 11:04 PM
धवनने ठोकला चौकार; 42 चेंडूंत 61 धावांची गरज
12 Apr, 19 10:50 PM
धनन एका बाजूनं दिल्लीची खिंड लढवत होता. त्याने 32 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या 53 धावांत 2 षटकार व 6 चौकारांचा समावेश होता. त्याच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने 10 षटकांत 2 बाद 88 धावा केल्या.
12 Apr, 19 10:50 PM
धनन एका बाजूनं दिल्लीची खिंड लढवत होता. त्याने 32 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या 53 धावांत 2 षटकार व 6 चौकारांचा समावेश होता.
12 Apr, 19 10:40 PM
12 Apr, 19 10:39 PM
12 Apr, 19 10:38 PM
श्रेयस अय्यर 6 धावांवर माघारी परतला
12 Apr, 19 10:34 PM
आंद्रे रसेलने पंचांच्या निर्णयावर व्यक्त केली नाराजी, पाहा व्हिडीओ
12 Apr, 19 10:32 PM
दिल्लीने पॉवर प्लेमध्ये 2 बाद 57 धावा केल्या.
12 Apr, 19 10:31 PM
सहाव्या षटकात दिल्लीला दुसरा धक्का बसला. आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर बाद झाला.
12 Apr, 19 10:19 PM
आंद्रे रसेलच्या पहिल्याच षटकात धवनला जीवदान मिळाले. चौथ्या षटकाचा दुसरा चेंडू धवनच्या बॅटीला चाटून दुसऱ्या स्लीपच्या दिशेने गेला, परंतु नितीश राणाला तो टीपता आला नाही आणि चेंडू सीमापार गेला.
12 Apr, 19 10:17 PM
तिसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर प्रसिध कृष्णाने दिल्लीला पहिला धक्का दिला. त्याने पृथ्वी शॉला ( 14) बाद केले.
12 Apr, 19 10:15 PM
लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दिल्लीला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी दहाच्या सरासरीने धावा केल्या.
12 Apr, 19 09:55 PM
12 Apr, 19 09:36 PM
त्यानंतर रसेलने दिल्लीच्या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याने 21 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 45 धावा केल्या
12 Apr, 19 09:16 PM
रबाडाने दिल्लीला आणखी एक यश मिळवून दिले. त्याने कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकला बाद केले.
12 Apr, 19 09:12 PM
शुबमनचा झंझावात किमो पॉलने रोखला. शुबमनने 39 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकार खेचून 65 धावा केल्या.
12 Apr, 19 09:04 PM
पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स सामन्यावर पकड निर्माण करेल असे वाटले होते. मात्र, कोलकाता नाइट रायडर्सच्या रॉबीन उथप्पा आणि शुबमन गिल यांनी सुरेख फटकेबाजी केली.
12 Apr, 19 09:02 PM
नितीश राणाने पुढच्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला, पण त्यानंतर ख्रिस मॉरिसने त्याचा त्रिफळा उडवला. तो 11 धावा करून तंबूत परतला.
12 Apr, 19 08:59 PM
शुबमनने 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आघाडीवर येऊन फलंदाजी करण्याची मिळालेली संधी त्याने हेरली आणि दमदार अर्धशतक झळकावत संघाचा धावफलक हलता ठेवला.
12 Apr, 19 08:40 PM
9व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर उथप्पाला बाद करण्यात कागिसो रबाडाला यश मिळाले. त्याने टाकलेल्या बाउंसरवर फटका मारण्याच्या नादात उथप्पा यष्टिरक्षक रिषभ पंतच्या हातात झेल देत माघारी परतला. उथप्पाने 30 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचून 30 धावा केल्या.
12 Apr, 19 08:28 PM
सुरुवातीच्या धक्क्यानंतर रॉबीन उथप्पा व शुबमन गिल यांनी कोलकाताला सावरले. दोघांनी पॉवर प्लेमध्ये संघाला 1 बाद 41 असा समाधानकारक पल्ला गाठून दिला.
12 Apr, 19 08:11 PM
12 Apr, 19 08:05 PM
जो डेन्लीला पहिल्याच चेंडूवर इशांत शर्माने बाद करताना कोलकाताला पहिला धक्का दिला.
12 Apr, 19 07:53 PM
शिखर धवनचा हा 150वा सामना आहे, आयपीएलमध्ये हा पल्ला गाठणारा तो 12 वा खेळाडू ठरणार आहे.
12 Apr, 19 07:52 PM
अमित मिश्राला 150 विकेटचा टप्पा गाठण्यासाठी एक खेळाडू बाद करावा लागणार आहे. लसिथ मलिंगानंतर 150 विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरणार आहे.
12 Apr, 19 07:52 PM
आंद्रे रसेलला आयपीएलमध्ये 50 विकेट पूर्ण करण्यासाठी 1 गडी बाद करावा लागणार आहे. आज त्याने दोन विकेट घेतल्यास कोलकाताकडून 50 विकेट घेणारा तो पहिलाच जलदगती गोलंदाज ठरणार आहे.
12 Apr, 19 07:40 PM
कोलकाता नाइट रायडर्स : जो डेनली, रॉबीन उथप्पा, कार्लोस ब्रेथवेट, शुबमन गिल, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कुलदीप यादव, पियूष चावला, लॉकी फर्ग्युसन, प्रसिध कृष्णा
12 Apr, 19 07:38 PM
दिल्ली कॅपिटल्सचा संघ : पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कॉलिन इंग्राम, ख्रिस मॉरिस, अक्षर पटेल, राहुल तेवाटिया, किमो पॉल, कागिसो रबाडा, इशांत शर्मा
12 Apr, 19 07:34 PM
कोलकाताची संपूर्ण मदार ही आंद्रे रसेलवर आहे. त्याला अन्य फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळत नाही. ख्रिस लीन, सुनील नरीन, रॉबीन उथप्पा आणि नितीश राणा यांना सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे. शुबमन गिलला सहाव्या स्थानावर खेळवण्याचा निर्णय चुकीचा ठरत आहे. त्यामुळे त्याला बढती दिली जाऊ शकते. पियुष चावला, कुलपीद यादव आणि नरीन यांच्यावर गोलंदाजीची भिस्त आहे.
12 Apr, 19 07:34 PM
दिल्ली कॅपिटल्सच्या संघात एक बदल. नेपाळच्या संदीप लामिछानेज्या जागी किमो पॉलला संधी
12 Apr, 19 07:30 PM
07- कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलमधील मागील दहा सामन्यांपैकी सातमध्ये दिल्लीला पराभूत केले आहे.